शोकाकुल वातावरणात लोकनेते विनायकराव मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण

शोकाकुल वातावरणात लोकनेते विनायकराव मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण 
बीड (प्रतिनिधी) लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरातील त्यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन कार्यक्रम अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी मेटे साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच मेटे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे, अशुतोष विनायकराव मेटे, रामहरी मेटे, वैशाली मेटे यांच्यासह संपूर्ण मेटे कुटुंबीय उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे, नारायणराव काशीद, अनिल घुमरे, सी.ए. बी. बी. जाधव , सुहास पाटील, तुळशीराम पवार, ज्ञानेश्वर कोकाटे, ज्ञानेश्वर चौधरी, पंडितराव माने ,उत्तमराव पवार, पत्रकार दिलीप सपाटे, शिवसंग्राम चे ठाणे शहराध्यक्ष प्रकाश खैरे, छत्रपती संभाजी नगरचे शहराध्यक्ष कुलदीप देशमुख, नारायण थोरात, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून मेटे साहेबांना अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अभंगातून लोकनेते विनायकराव मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांनी गीत गायनातून श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी वातावरण अत्यंत भावुक झाले होते. मेटे साहेबांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक कार्यकर्ते व उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला. त्यांच्या अकाली निधनाने बीडसह महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या कार्याची व विचारांची प्रेरणा आजही असंख्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरत आहे.

चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त उपस्थितांनी लोकनेते विनायकराव मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी