विनायकराव मेटे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व निराधारांना चटायांचे वाटप.
विनायकराव मेटे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व निराधारांना चटायांचे वाटप.
बीड (प्रतिनिधी) : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसंग्राम विध्यार्थी आघाडी बीड जिल्हा कार्यआध्यक्ष मनीष सुहासराव पाटील यांच्या वतीने व्यंकटेश पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना वही व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बीड येथील जिव्हाळा निराधार केंद्रात शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत निराधारांना चटायांचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देतानाच निराधारांना मदतीचा हात देत स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि समाजातील गरजू, निराधार व्यक्तींना आवश्यक वस्तूंची मदत करणे, या उद्देशाने दोन्ही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मेटे साहेबांनी जपलेली सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रगती आणि वंचित घटकांच्या सेवेसाठीची भूमिका पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
व्यंकटेश पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यक्रमास शिवसंग्रामचे शहराध्यक्ष सुहास पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य हावळे सर, उद्योजक सुरज तेंडुलकर, नगरसेवक नागेश तांबारे , तसेच वैभव घुमरे, प्रद्युम परजने, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिव्हाळा निराधार केंद्रातील कार्यक्रमास शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत निराधारांना चटायांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, शिवसंग्रामचे मराठवाडा अध्यक्ष अनिल घुमरे, योगेश शेळके, पंडितराव माने, गणेश साबळे, कैलास शेजाळ, अशोक लोकरे, हरिश्चंद्र ठोसर, नामदेव धांडे, मेंगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप तसेच निराधारांना चटायांचे वाटप या दोन्ही सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment