महापुरुषांचे विचार समाजमनात रुजविणाऱ्या स्वपनील वरपे पाटील ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ने सन्मानित

महापुरुषांचे विचार समाजमनात रुजविणाऱ्या स्वपनील वरपे पाटील यांना ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ने सन्मानित

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर, गोरक्षण आणि सामाजिक कार्याची दखल
बीड : मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मराठा साम्राज्य विजय उत्सवा’निमित्त राक्षसभुवन येथे आयोजित करण्यात आलेल्या राक्षसभुवन लढाई स्मरण सोहळ्यात समाजसेवक स्वपनील वरपे पाटील यांना त्यांच्या सामाजिक व वैचारिक कार्याची दखल घेत ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

दि. १० ऑगस्ट १७६३ रोजी राक्षसभुवन येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. मराठा साम्राज्याच्या या ऐतिहासिक विजयाची स्मृती आणि मराठ्यांच्या शौर्याची गौरवशाली परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी राक्षसभुवन येथे मराठा साम्राज्य विजय उत्सव व लढाई स्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
याच ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्यात स्वपनील वरपे पाटील यांना ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.

बीड शहरातील पहिले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, गोरक्षणासाठी केलेले कार्य, समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम तसेच छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व इतर महापुरुषांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे केवळ एक वास्तू नसून त्यांच्या त्याग, शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारे केंद्र असावे, या भावनेतून स्वपनील वरपे पाटील यांनी स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतला. त्याचबरोबर महापुरुषांचा इतिहास केवळ पुस्तकांमध्ये न राहता तो नव्या पिढीच्या मनात रुजावा, युवकांनी आपल्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी आणि समाजासाठी सकारात्मक योगदान द्यावे, यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी श्री. शणेश्वर मंदिर परिसर, राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गुजरात येथील स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते स्वपनील वरपे पाटील यांना ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

यावेळी धाराशिवचे आमदार श्री. कैलास पाटील साहेब, गोरक्षक मिलिंद (भाऊ) एकबोटे, दिग्दर्शक व अभिनेते श्री. सुधीर निकम सर, प्रमुख वक्ते श्री. गोरक्षनाथ आबुज, पानिपतच्या लढाईतील वंशज श्री.मराठा रामनारायण यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास विविध जिल्हे व तालुक्यांतून आलेले समाजसेवक, गोरक्षक, सनातन धर्म व हिंदू धर्मासाठी कार्य करणारे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने मित्रपरिवार व बांधव उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्वप्नील वरपे पाटील म्हणाले, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे, महापुरुषांचे विचार पुढील पिढीच्या मनात रुजवणे आणि समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहणे हेच माझे ध्येय आहे. राक्षसभुवनसारख्या ऐतिहासिक भूमीत, मराठ्यांच्या शौर्याच्या स्मृती जपणाऱ्या या सोहळ्यात मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे.”

“हा पुरस्कार माझ्या कार्याची केवळ दखल नसून, यापुढे समाजासाठी आणखी मोठ्या जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. माझ्या सामाजिक कार्यात माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या प्रत्येक मित्र, बांधव आणि समाजबांधवांचा हा सन्मान आहे,” अशी भावना स्वपनील वरपे पाटील यांनी व्यक्त केली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी