११ वी उत्तीर्ण खंडित विद्यार्थ्यांना १२ वीत प्रवेश मिळावा,बीड जिल्हा मुप्टा शिक्षक संघटनेची मागणी



बीड( प्रतिनिधी)
२०२४ व त्यापूर्वी इयत्ता ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १२ वी मध्ये प्रवेश मिळावा कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार अशी मागणी मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्हा यांनी शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली आहे.
सन 2024 आणि त्यापूर्वी इयत्ता अकरावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांनी मागील वर्षी ऑफलाइन प्रवेश घेतला होता आणि यावर्षीच्या शैक्षणिक वर्ष 26-27 साठी प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लॉगिन आयडी देऊन सदरील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी परीक्षा देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येऊन विद्यालय व महाविद्यालयास आपल्या स्तरावरून आपण सूचना आदेश निर्गमित करावा याविषयीचे निवेदन मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्हावतीने जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हासचिव प्रा.शशिकांत जावळे, प्रा. रोहित डोंगरे
यांनी सादर केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी