कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी संवाद मेळावा; आधार प्रणालीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी संवाद मेळावा; आधार प्रणालीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

लिंबागणेश येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा उपक्रम; नवीन पीककर्जाबाबत मार्गदर्शन
बीड प्रतिनिधी :-(दि.६ ) राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६-२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार आज दि. ६ गुरूवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी राहुल पवार, लिंबागणेश शाखेचे व्यवस्थापक सोन्याबापू रासकर, सहाय्यक व्यवस्थापक अविनाश सोनावणे तसेच विविध शाखांतील बँक मित्र व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून सेवा सोसायटीचे चेअरमन रविबापू निर्मळ, बँकिंग पॉईंटचे सुरज ढास,जयदेव गिरे , समाधान ढास,बाळकृष्ण थोरात, संतोष भोसले आणि विक्रांत वाणी, भगवान मोरे, दत्ता ढवळे, रामदास मुळे, महादेव कुदळे,अक्षय वायभट उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.



आधार प्रणालीकरण तातडीने पूर्ण करा : सोन्याबापू रासकर

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे लिंबागणेश शाखा व्यवस्थापक सोन्याबापू रासकर यांनी कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना आधार प्रणालीकरणाबाबत जनजागृती केली. तसेच नवीन पीककर्जासाठी सुरू करण्यात आलेल्या 'कृषिका' ॲप्लिकेशनविषयी सविस्तर मार्गदर्शन करून आधार प्रणालीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी ते तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले.



२३५१ शेतकरी पात्र; ५१६ शेतकऱ्यांचे आधार प्रणालीकरण अद्याप बाकी

महाराष्ट्र ग्रामीण बँक, लिंबागणेश शाखेअंतर्गत एकूण २३५१ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. पहिल्या यादीत ८५८ शेतकऱ्यांची नावे समाविष्ट असून त्यापैकी आतापर्यंत ३४२ शेतकऱ्यांनी आधार प्रणालीकरण पूर्ण केले आहे. मात्र ५१६ शेतकऱ्यांचे आधार प्रणालीकरण अद्याप प्रलंबित असल्याने त्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शाखा व्यवस्थापक सोन्याबापू रासकर यांनी केले.


नवीन पीककर्जासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

संवाद मेळाव्यात कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर नवीन पीककर्ज मिळविण्याची प्रक्रिया, ई-केवायसी, आधार प्रणालीकरण, आवश्यक कागदपत्रे तसेच 'कृषिका' ॲप्लिकेशनद्वारे कर्जमागणी नोंदविण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी