बहुजन बांधवांना एकत्रित करून आंबेडकरी चळवळ मजबूत करू – शैलेंद्र पोटभरे
माजलगाव (बीड प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी)च्या वतीने माजलगाव तालुक्यातील मोजे वांगी येथे पक्षाच्या शाखेचा उद्घाटन सोहळा व कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बहुजन एकजूट, सामाजिक ऐक्य आणि आंबेडकरी विचारांच्या प्रसारावर भर देण्यात आला.
मेळाव्याला संबोधित करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी)चे मराठवाडा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे म्हणाले, "देशात दोन विचारधारा समोरासमोर आहेत. एक आरएसएसची आणि दुसरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची. समाजात जातीय तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचे प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर आधारित बहुजन समाजाची एकजूट निर्माण करून आंबेडकरी चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी रिपाई (एकतावादी) कटिबद्ध आहे."
या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी)चे माजलगाव तालुका युवा अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी केले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हाध्यक्ष संजय भाऊ भद्रे, जिल्हा उपाध्यक्ष डी. एस. तूपसमुद्रे, महादेव बाप्पा शिंदे, अशोक गवळी, छत्रपूर गायकवाड, उत्तम गायकवाड, मुंजा गायकवाड, मनोज गायकवाड, किरण शिंदे, नितीन पोटभरे, साहेबा शिंदे, सुशील नाना शिंदे, सम्राट शिंदे, कपिल रुमाले यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात नव्या शाखेच्या माध्यमातून संघटन विस्तार, बहुजन समाजाची एकजूट आणि आंबेडकरी विचार अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment