लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; पोलिस प्रशासनाच्या दडपशाहीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, गुन्हे मागे घेण्याची मागणी

लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; पोलिस प्रशासनाच्या दडपशाहीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, गुन्हे मागे घेण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे
बीड:-( दि.३) : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान न्यायाच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना परवानगी नाकारण्यात आली. तसेच पालकमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले असतानाही ऐनवेळी भेट न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी "न्याय द्या" अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'लोकशाही वाचवा', 'संविधान वाचवा', 'आंदोलन आमचा हक्क आहे', 'पोलिस प्रशासनाच्या दडपशाहीचा धिक्कार असो' अशा घोषणांनी निदर्शने करण्यात आली.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, संभाजीनगर परीक्षेत्र यांना निवेदन पाठविण्यात आले.

आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंच), नितीन सोनवणे ( राज्य प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना बीड), प्रेम कांबळे( दलित पँथर युवा जिल्हाध्यक्ष बीड),, राजेंद्र आमटे (शेतकरी हक्क आंदोलक), किष्किंधा पांचाळ (जिल्हाध्यक्ष, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज, बीड), सिता दहे, सादेक सय्यद (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक, बीड), सामाजिक कार्यकर्ते हनुमान घोडके, मिलिंद सरपते,भिमराव कुटे, अरूण पांचाळ, समाधान पांचाळ,प्राचार्य डी. जी. तांदळे (मार्गदर्शक, मराठवाडा शिक्षक संघ), ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, नितीन जायभाये (अध्यक्ष, बीड शहर बचाव मंच) , सुर्यकांत ठोकळ, भिंगरेश जोगदंड,राजेश वाघमारे, आनंद डोंगरे,सुंदर वाघमारे, अविनाश वडमारे,शेख अख्तर , सादेक सौदागर,रफिक पठाण, आण्णा डांगे, बबिता शिंदे, सय्यद सादेक, दशरथ थोरात, शारदा थोरात,उमेश गुरू, विनोद कुटे,दिपक शिंदे,प्रविण आनेराव, जालिंदर जगताप,
आदी सहभागी झाले होते.
डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीदरम्यान मृत्यू झालेल्या छाया गणेश पांचाळ यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून विविध आंदोलने व निवेदने देण्यात आली. मात्र न्याय न मिळाल्याने किष्किंधा पांचाळ यांनी पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर "छाया पांचाळ यांना न्याय द्या" अशा घोषणा दिल्या.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी आंदोलनकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचा तसेच बाळासाहेब मोरे पाटील यांना घोषणाबाजी केली नसतानाही मारहाण केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

डॉ. ढवळे यांनी पुढे सांगितले की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १९(१)(ब) नुसार नागरिकांना शांततापूर्ण व विनाशस्त्र एकत्र येऊन आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असल्याचे विविध निर्णयांमध्ये स्पष्ट केले आहे. मात्र बीडमध्ये शांततापूर्ण आंदोलनांनाही परवानगी नाकारून आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याने ही लोकशाहीविरोधी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी