अमित तिवारी यांच्या भूमिकेतून मनुवादी मानसिकतेचे दर्शन; दलितांना कमी लेखण्याचा प्रयत्न थांबवावा – डॉ. जितीन वंजारे
प्रतिनिधी | बीड
अभिजित दिपके यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा अभिजित दिपके यांचे मेव्हणे डॉ. जितीन वंजारे यांनी अमित तिवारी यांच्या भूमिकेवर टीका करत निवेदन प्रसिद्ध केले आहे.डॉ. वंजारे म्हणाले, "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तत्कालीन बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनीही त्यांच्या सामाजिक कार्याला व शिक्षणाला मोलाचे सहकार्य केले. त्या संधीचा लाभ घेत बाबासाहेबांनी अमेरिकेसह परदेशात उच्च शिक्षण पूर्ण केले, बॅरिस्टर झाले आणि भारतात परतल्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून देशाला संविधान दिले. हा इतिहास सामाजिक न्याय, शिक्षण आणि समान संधीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे."
ते पुढे म्हणाले, "आजही दलित समाजातील एखादी व्यक्ती शिक्षण, उद्योग, राजकारण किंवा इतर क्षेत्रात यशस्वी झाली की तिच्या प्रगतीवर संशय घेण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी दिसून येते. ही मानसिकता बदलली पाहिजे. आम्ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी आहोत. आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. डॉ. वंजारे यांनी पुढे असे आवाहन केले की, माहिती अधिकार (RTI) हा लोकशाहीतील प्रभावी कायदा आहे. त्याचा वापर सार्वजनिक हितासाठी व्हायला हवा. शासनाच्या निधीचा वापर, सार्वजनिक प्रकल्पांची गुणवत्ता, रस्ते, पूल, सार्वजनिक खर्च, कोविड काळातील निधी, जीएसटी महसूल तसेच इतर सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पारदर्शकता यावी यासाठी आवश्यक तेथे माहिती अधिकाराचा वापर करावा. अशा सर्व बाबींची चौकशी कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने व्हावी."
शेवटी त्यांनी संविधानातील समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा पुनरुच्चार करत सर्व समाजघटकांनी एकमेकांचा सन्मान राखावा, पूर्वग्रहांना खतपाणी घालू नये आणि संविधानाच्या चौकटीत राहून सार्वजनिक प्रश्न उपस्थित करावेत, असे आवाहन केले.अभिजित दीपके यांच्या वडिलांनी परदेशात शिक्षणासाठी कर्ज घेतले होते, विशेष बाब म्हणजे बोस्टन युनिव्हरसिटीत शिक्षणासाठी त्यांना स्कॉलरशिप ही मिळालेली आहे. मित्र,सहकारी, पाहुणे यांच्या सहकार्याने ते आज उच्च विद्या विभुशीत आहेत, आणि सीजेपी च्या माध्यमातून संबंध भारतामध्ये त्यांनी यशस्वी विद्यार्थी आंदोलन उभ केल आहे. नीट पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन शिव,शाहू,फुले आणि महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आधुनिक भारतात लोकशाही जिवंत आहे हे सिद्ध केल.भरतात हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, लोकांच्या हिताचं सरकार असन गरजेचे आहे.बारा वर्षात ज्या पक्षाच्या बूथ प्रमुखांचा सुद्धा गैर प्रकरणात राजीनामा झाला नाही तेथे अभिजित दिपके यांच्या कोक्रोच जनता पार्टी ने 34 दिवस जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन करून वजनदार बलाढ्य केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला हे पचणी न पडल्यामुळे की काय? अमित तिवारी सारखे मनुवादी लोक खुळचट कल्पना आणि पूर्वग्रहदूषित बुद्धी समोर ठेऊन असे आर टी आय करत आहेत अश्या लोकांचा जाहीर निषेध. शिक्षण व्यवस्थे साठी लढणाऱ्या लोकांचे पाय धुऊन प्यायला पाहिजेत तिथे गोबरभक्त गु मूत्र पीणाऱ्याला शिक्षणाची कसली किंमत? असो अमित तिवारी आणि त्याला समोर करणाऱ्या मनुवादी लोकांचा जाहीर निषेध आणि अभिजित दिपके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, इन कलाब जिंदाबाद, जयभिम, जय संविधान, जय भारत.
Comments
Post a Comment