बीडमध्ये खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा स्वपनील वरपे यांच्या कडून तीव्र निषेध
बीड प्रतिनिधी : महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज बीड येथे कार्यकर्त्यांनी बीड बस्थानक येथील मुतारी मध्ये पोस्टर लावून तीव्र निषेध आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान निषेधाचे फलक व पोस्टर प्रदर्शित करून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये वैचारिक विरोधाला स्थान असले तरी वैयक्तिक पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषा वापरणे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारे नाही.
यावेळी, मा. जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्ष, बीड विभाग, स्वप्नील वरपे पाटील म्हणाले, "राजकीय मतभेद असू शकतात; मात्र एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल सातत्याने अवमानकारक भाषा वापरणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रातील जनतेने हे वारंवार पाहिले आहे. जनतेच्या प्रश्नांवर विधायक भूमिका मांडण्याऐवजी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. संबंधित वक्तव्याबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने अधिक व्यापक निषेध आंदोलन करण्यात येईल."
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भविष्यात सुसंस्कृत राजकीय संवाद राखण्याचे आवाहन करत संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
Comments
Post a Comment