उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात सहभागी होण्याचे भाई गौतम आगळे यांचे 59 जातीच्या समाजाला आवाहन


    परळी दि. ८( प्रतिनिधी ) बौद्धांसोबत भांडायची ही वेळ नसून बौद्धांच्या खांद्याला खांदा लावून लढाईची ही वेळ आहे. आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव आपल्याला म्हणून पडायचा आहे त्यासाठी ५९ जातीच्या समूहाने आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा हा आपला मोर्चा आहे असे समजून सर्व समाजाने या महामोर्चात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कामगार नेते तथा भारतीय दलित पॅंथर मराठवाडा महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
       आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जाती समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र महाराष्ट्र सरकारचे आहे, आणि ही फूट ५९ जातीच्या समाजासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे कारण यातून समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव तथा भारतीय दलित पॅंथर मराठवाडा महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चास जाहीर पाठिंबा देऊन परळी वैजनाथ मध्ये निघणारा 10 ऑगस्ट चा उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा म्हणजे आपला मोर्चा आहे, असे समजून जो येईल त्याला सोबत घेऊन या ! मोर्चात हजारोच्या संख्येने सर्व ५९ जातीच्या समाजाने आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कामगार नेते तथा भारतीय दलित पॅंथर मराठवाडा महासचिव भाई गौतम आगळे सर बीड जिल्हाध्यक्ष तथा संपादक आर.एच.टी.सी.न्यूज वैजनाथ गायकवाड, तालुका अध्यक्ष माणिक बनसोडे, शहराध्यक्ष धम्मदीप रोडे यांनी एका संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी