​ बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरामध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळला जाणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही-​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा

​ बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरामध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळला जाणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही-​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा

  बिकानेर स्वीट होम' तातडीने बंद करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन-- मोरे / खेडकर
​ आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
          बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरातील जिजामाता चौकात असलेल्या 'बिकानेर स्वीट होम'चा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असुन या दुकानाचा मालक शिरूर कासार तालुक्यातील दहीवंडी गावात अत्यंत घातक आणि भेसळयुक्त पदार्थ तयार करत असल्याचे उघड झाले .
 ​ नागरिकांच्या आणि निष्पाप लहान मुलांच्या जीवाशी खेळून या ठिकाणी खालील विषारी आणि डुप्लिकेट पदार्थ बनवले जात होते .
   भेसळयुक्त खवा/
 केमिकल आणि डुप्लिकेट दुधापासून बनवलेला केक/
 विषारी पेढे आणि गुलाबजामुन/ 
 भेसळयुक्त बासुंदी आणि पनीर
​हा थेट माणसांना मारण्याचा आणि त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार उघड झाला. बाहेरून येणाऱ्या लोकांना त्रास व्हावा ही आमची भूमिका नाही, परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांनी इथल्या मराठी माणसाच्या जीवाशी खेळू नये! हा खेळ आम्ही कदापि खपून घेणार नाहीत . आज नाही तर उद्या हे दुकान बंद करणार यात तीळ मात्र शंका नाही.
   प्रशासनाला जाहीर इशारा--
या दुकानाला प्रशासनाने तात्काळ सील ठोकावे, 
अन्यथा आज नाही तर उद्या याच दुकानाची तोड फोड करून शिवसेना (उद्धवजी बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात दिला. 
   शिरूर कासार तालुक्यातील ​ तमाम जनतेला नम्रतेचे आवाहन--
शिरूर कासार शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना नम्रतेचे आवाहन करण्यात येते की , आपल्या मुलाबाळांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी या लढ्यात सर्व स्तरातील नागरिक /माता- भगिनींनी साथ देण्याचे आवाहन
​ शिरूर कासार शिवसेना तालुकाप्रमुख सोपान मोरे /
शिवसेना बीड उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर यांनी प्रसिद्धस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी