आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेचे दत्तात्रय कदम यांचा समाजोपयोगी उपक्रम; सौंदाना येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


पाटोदा (प्रतिनिधी) : आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सौंदाना येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ नाईकनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवराज कदम, नारायण कदम, शिवदास आगुंडे, महादेव कदम, दत्ता कदम, बालाजी कदम, ईश्वर कदम आणि सचिन कदम उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी प्रहार दिव्यांग संघटनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून समाजात सकारात्मक संदेशही पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी