पाटोद्यात भटक्या कुत्र्यांची दहशत घरात घुसून लहान मुलांवर व शेळ्यांवर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पाटोद्यात भटक्या कुत्र्यांची दहशत घरात घुसून लहान मुलांवर व शेळ्यांवर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पाटोदा ( प्रतिनिधी) पाटोदा शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील काही भागांमध्ये भटके कुत्रे थेट घरात घुसून लहान मुलांवर तसेच शेळ्यांवर हल्ले करत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.लहान मुले घराबाहेर खेळण्यासाठी जाण्यास घाबरत असून, वृद्ध नागरिकांनाही रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे कळप रस्त्यावर फिरत असल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे.नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
याबाबत नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment