बीडच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेप्रकरणी हायकोर्टाची दखल; संबंधितांना नोटिसा -सय्यद सादेक

बीडच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेप्रकरणी हायकोर्टाची दखल; संबंधितांना नोटिसा -सय्यद सादेक शहराध्यक्ष आम आदमी पार्टी
बीड, प्रतिनिधी – बीड शहरातील 114 कोटी रुपयांच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सय्यद सादेक यांनी दाखल केलेल्या याचिकेची छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याचिका स्वीकारून संबंधित अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

याचिकेनुसार, सुमारे 114 कोटी रुपयांची योजना असूनही जवळपास 100 कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही बीड शहरातील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत माहिती मागवूनही प्रशासनाने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने सय्यद सादेक यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.

उच्च न्यायालयाने संबंधित अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नोटिसा बजावत 28 जुलै 2026 पर्यंत न्यायालयात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ही याचिका छत्रपती संभाजीनगर येथील ॲड. पंकज कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आली असून, बीड येथील ॲड. प्रवीण नेहरकर आणि ॲड. शिवाजी सपकाळ यांनीही या प्रकरणात कायदेशीर कामकाज पाहिले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी