माजी सैनिक तथा ज्येष्ठ सामाजिक आंदोलक प्रकाश वाघमारे यांना 'मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान पुरस्कार-२०२६'

माजी सैनिक तथा ज्येष्ठ सामाजिक आंदोलक प्रकाश वाघमारे यांना 'मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान पुरस्कार-२०२६'
बीड | प्रतिनिधी
माजी सैनिक तथा ज्येष्ठ सामाजिक आंदोलक प्रकाश वाघमारे यांना युवा लोकमित्र (महाराष्ट्र शासन जाहिरात सूची समाविष्ट साप्ताहिक) यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा-२०२६ मध्ये 'मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान पुरस्कार-२०२६' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दि. २० जून रोजी ताज पॅलेस, कादरपुरा, बार्शी नाका, बीड येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. भारतीय सैन्यात उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर समाजातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ सामाजिक आंदोलक म्हणून प्रकाश वाघमारे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
देशसेवेबरोबरच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवा लोकमित्र परिवार, बीड यांच्या वतीने त्यांचा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या पुरस्कारामुळे प्रकाश वाघमारे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन युवा लोकमित्र परिवार, बीड यांच्या वतीने करण्यात आले होते. पुरस्कार निवड समितीने त्यांच्या देशसेवा व समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत हा सन्मान प्रदान केला. याबाबतची माहिती साप्ताहिक युवा लोकमित्रचे संपादक शेख ताहेर जाफर यांनी दिली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी