कर्तव्याबरोबरच वारकऱ्यांची सेवा; पाटोदा पोलिसांचा आदर्श सेवाभावी उपक्रम


पाटोदा (प्रतिनिधी) आषाढी वारीनिमित्त पाटोद्यात आगमन झालेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यादरम्यान पाटोदा पोलिसांनी कर्तव्याबरोबरच सेवाभावाचाही आदर्श घालून दिला. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकरी भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडताना पोलिसांनी पिण्याचे शुद्ध पाणी, चहा व नाश्त्याची व्यवस्था करून वारकऱ्यांची मनापासून सेवा केली. पालखी मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक सुरळीत ठेवणे, वारकऱ्यांना सुरक्षित मार्गदर्शन करणे तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना आवश्यक ती मदत करणे, ही सर्व जबाबदारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली.सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारकरी भाविकांना मोठा दिलासा मिळाला. पाटोदा पोलिसांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे आणि मानवतेचे वारकरी व नागरिकांनी मनापासून कौतुक केले."खाकी वर्दीतील कर्तव्यदक्षता आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम म्हणजे पाटोदा पोलीस," अशा शब्दांत अनेक वारकरी भाविकांनी भावना व्यक्त केल्या. संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा सेवाभावी उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी