मुस्कान शेख व छाया पांचाळ प्रसुती दरम्यान मातामृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
मुस्कान शेख व छाया पांचाळ प्रसुती दरम्यान मातामृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
बीड जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन; मुख्यमंत्री, पालकमंत्री व आरोग्यमंत्र्यांना निवेदन :- डॉ.गणेश ढवळे
बीड:-( दि.२०): बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुस्कान सिद्दिक शेख आणि छाया गणेश पांचाळ यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्यचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज ् (दि. २०) सोमवार रोजी जिल्हा रुग्णालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.
यावेळी " मुस्कान शेख यांना न्याय द्या' "छाया पांचाळ यांना न्याय द्या", ' दोषीं वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते युनुस शेख, मुबीन शेख, शिवशर्मा शेलार, भिमराव कुटे,किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था बहिरवाडी बीड), बाळासाहेब मोरे पाटील (प्रांताध्यक्ष, भीमशक्ती-शिवशक्ती विचारमंच), माजी सैनिक अशोक येडे, सादेक सय्यद (बीड शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी), पठाण रफिक (बीड जिल्हा उपप्रमुख आम आदमी पार्टी बीड), राजेंद्र आमटे ( शेतकरी हक्क आंदोलक), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय तांदळे, लेक लाडकी अभियानचे बाजीराव ढाकणे, शेख आकरम, सत्तार रज्जाक,मोईन सरफोद्दीन, समाजसेवक सरफराज,शेख मुबारक,महेमुद मुबारक
आदी सहभागी होते.
बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान मुस्कान सिद्दिक शेख आणि छाया गणेश पांचाळ मृत्यूची प्रकरणे घडली असून, संबंधितांवर अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. चौकशी समित्यांवर समित्या नेमून वेळकाढूपणा केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
मयत मुस्कान शेख व छाया पांचाळ यांचे नातेवाईक आंदोलनात सहभागी
मुस्कान शेख यांचे पती सिद्दीक शेख, मामा मुन्ना शेख, चुलते जुबेर शेख,मोईन शेख,सत्तार शेख,रहिम शेख तसेच छाया पांचाळ यांचे पती गणेश पांचाळ,भाऊ आकाश कळसकर, कृष्णा दळवी,मसु पवार, गणेश घाडगे,बाळु कांबळे,सीता दहे,लहानाबाई कटकाळे, अमोल मुळे,शेख आक्रम आदी नातेवाईक सहभागी झाले होते.
प्रमुख मागण्या
मुस्कान सिद्दिक शेख आणि छाया गणेश पांचाळ यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
चौकशीच्या नावाखाली होत असलेल्या दिरंगाईबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी.
चौकशी समित्यांची निष्पक्ष पुनर्रचना करावी.
मृत्यू प्रकरणांतील जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
Comments
Post a Comment