गुणवंत विधार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न
येवता/विडा:प्रतिनिधी:सा. वा.दि.१७ रोजी
विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळ (सा) सांगवी ता.केज,मिराबाई शिक्षण प्रसारक मंडळ माळेगांव ता.केज व रेणूकामाता कृषि विकास प्रतिष्ठाण देवगाव संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तथा व्यावसायिक अभ्यासक्रमातील शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दिनांक १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रेणूकामाता सामाजिक सभागृह रामकृष्णगड (आंबळाचे बरड) येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.विलासजी जाधव साहेब व बीड जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांनी भूशविले
यावेळी माध्यमिक विद्यालय,उच्च माध्यमिक महाविद्यालय,व्यावसायिक अभ्यासक्रमातील २०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल,श्रिफळ,ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
यशाचा मार्ग कधीही सोपा नसतो.अनेकदा अपयशाची भीती, अभ्यासाचे दडपण आणि इतरही अनेक आव्हाने तुमच्यासमोर असतील.पण या सर्व अडचणींवर मात करत तुम्ही जे यश संपादन केले आहे,ते खरोखरच कौतुकास्पद आसल्याचे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.विलास जाधव साहेब यांनी केले.
आजच्या या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे अथक परिश्रम, रात्रीचा दिवस करून केलेला अभ्यास आणि पालकांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनाची मोठी तपस्या असून आज येथे उपस्थित असलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
प्रसंगी विक्रम(बप्पा)मुंडे,विजयकांत मुंडे, अतुल मुंडे,भगवान सेनेचे अध्यक्ष मुरलीधर (बप्पा) माजी पंचायत समिती सदस्य वसंत (भाऊ) केदार,सखाहरी (तात्या) गदळे,अतुल (दादा) मुंडे,प्रा.माधूरीताई मुंडे,देवगावच्या सरपंच सौ.रूपालीताई मुंडे,सांगवीचे सरपंच संजय केदार, पिंपळगावचे सरपंच सचिन गायकवाड,आंधळेवाडीचे सरपंच नामदेव आंधळे,एकुरका गावचे सरपंच प्रशांत केदार,माजी सरपंच श्रीहरी धस, जेष्ठ नेते अशोकराव वाघमारे,काशिदवाडीचे माजी सरपंच महादेव जाधवर,देवगावचे उपसरपंच शरद मुंडे,देवगावचे माजी उपसरपंच विठ्ठल मुंडे,रामा आबा मुंडे,पी.डी.आबा मुरकुटे,डी.एल नागरगोजे,संस्था सर्व विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment