अंबाजोगाई कृषी कार्यालयाचे कर्मचारी झाले गुटखा प्रेमी-लोक जनशक्ती पार्टी (रा)
अंबाजोगाई कृषी कार्यालयाचे कर्मचारी झाले गुटखा प्रेमी-लोक जनशक्ती पार्टी (रा)
बीड : शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा म्हणून ओळखला जातो याच शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यालय अस्तित्वात आहे परंतु अंबाजोगाई कृषी कार्यालय हे गुटख्यामुळे चर्चेत येत असल्याचे दिसून येत आहे काल दिनांक 13/7/2026 रोजी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने संबंधित कृषी कार्यालयात पाहणी केली असता या कृषी कार्यालयात अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे अनेक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकलेले डाग स्पष्ट दिसत आहेत यातील कळसच म्हणजे एका अधिकाऱ्याच्या टेबल खाली गुटखा खाऊन थुंकण्यासाठी एक डस्टबिन दिसत आहे त्या डस्टबिनमध्ये गुटखा खाऊन लाल रंगाचा मोठा थर निर्माण झालेला संबंधित व्हिडिओमध्ये दिसत आहे तसेच कार्यालयातील बेसिंग हे हात धुण्यासाठी आहे का गुटखा खाऊन थुंकण्यासाठी आहे हेच संबंधित व्हिडिओ पाहून कळत नाही कृषी अधीक्षक साहेब आपण कार्यालयाकडे थोडे लक्ष देऊन संबंधित गुटखा खाऊन थुंकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा तुमच्या कार्यालयात अनेक ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून बंदी असलेला गुटखा विमल याच्या पुड्यांचा खच संबंधित व्हिडिओमध्ये दिसत आहे तरीही कृषी अधिकारी अंबाजोगाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस काढाव्यात अन्यथा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल याची नोंद आपण घ्यावी
Comments
Post a Comment