सरकार च्या निकृष्ट कामावर बोलणारे भाड्याचे टट्टू असतील तर निकृष्ट काम करणारे गुत्तेदार तुमचे जावई आहेत का?-डॉ.जितीन वंजारे
आज-काल राजकारण एकदम खालच्या पातळीला जाऊन केलं जात आहे. महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पवित्र संविधान भारत देशाला दिलं यामध्ये जितकी पावर सरकारला असेल तितकीच एव्हाना त्याहूनही अधिक पावर विरोधी पक्षाला दिली गेलेली आहे. लोकशाही ही विरुद्ध पक्षावर अवलंबून असते परंतु आजकाल मिल बाटके खायेंगे अशा पद्धतीची विवरचना भारतीय राजकारणामध्ये दिसून येत आहे. जेव्हा सभागृहात बसलेले टट्टू जनहिताचे काम करत नाहीत आणि भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, बाजारीकरण वाढलं जातं तेव्हा ही लढाई सर्वसामान्यांना हातात घ्यावी लागते अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जो सध्याच्या चालू सरकारचा फुसका विकास चालू आहे विकासाच्या नावाखाली नंगानाच चालू आहे, उद्घाटनापूर्वीच फुले पडत आहेत, उद्घाटन झाल्यानंतर दोन-चार दिवसात ते उध्वस्त होत आहेत, निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत, कॉन्ट्रॅक्ट जवळच्या माणसाला देऊन आदानी अंबानीसारख्यांच्या उद्योगपतींच्या घशामध्ये संपूर्ण देश घातला जातोय मग मी एक सामान्य माणूस म्हणून असा प्रश्न पडतो की तुमच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे त्याच्या विरोधात बोलल्यावर तुम्ही डायरेक्ट त्यांना भाड्याचे टुटू म्हणतात तर तुम्ही सरकार चालवता एक रुपया मध्ये एक एकर जमीन अदानी आंबानीला देता तर तुम्ही पण येथील आदानी अंबानीचे भाड्याचे टट्टू आहात का? यावरून हे सिद्ध झालं आहे आणि खरं बोलणारे जर भाड्याचे टट्टू असतील तर निकृष्ट दर्जाचे काम करणारे गुत्तेदार तुमचे लाडके जावई आहेत का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांनी केला आहे.
सभागृहामध्ये बोलत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निकृष्ट काम केलेल्या मिसिंग लिंक वर टीका टिप्पणी करणाऱ्या सामान्य लोकांना भाड्याचे टट्टू असे म्हटले गेले कायदेशीर कार्यवाही करू अशी धमकी दिली महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र आहे. देशाचा तर नंगा नाच केलाच आहे परंतु महाराष्ट्राचा नंगानाच होऊ दिला जाणार नाही. तुम्ही सरकारमध्ये बसले आहात तुम्ही कोणाची तरी गुलाम आणि टट्टू असू शकता येथील जनतेने हजारो वर्षापासून अनेक राजे महाराजे तुमच्यासारखे सीएम,पीएम आमदार,खासदार, मंत्री संत्री पाहिले आहेत परंतु निकृष्ट काम केल्यावर त्याची वाहवा करून त्यांची पाठराखण करणारा तुमच्यासारखा धमक्या देणारा सीएम आज पर्यंत आम्ही पाहिला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा आणि त्यांनी दिलेल्या धमकीचा मी जाहीर निषेध करतो असे प्रतिपादन डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूररीकर यांनी केले. केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्यावर तो देशद्रोही ग्राह्य केला जातो, राज्याच्या बाबतीत बोलल्यानंतर तो भाड्याचे टट्टू म्हणून ग्राह्य धरले जाते,हम करे सो कायदा अशा हुकुमशाहीच्या राज्यात आम्ही राहतो की काय? असा प्रश्न आम्हाला पडत आहे राम मंदिर चोरीवर हे बोलत नाहीत, निकृष्ट दर्जाचे कामावर बोलत नाहीत,मिसिंग लिंक तीन महिन्यातच पडली बोलत नाहीत,नांदेड येथील पूल कोसळला बोलत नाहीत, मोठमोठ्यांची अतिक्रमण ह्यावर बोलत नाहीत,शिक्षणात होणारे बाजारीकरण, बंद होणाऱ्या मराठी शाळा यावर यांचं तोंड उघडत नाही,शिक्षणाचे बाजरीकरण केलं महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. शेतकऱ्यांना खते बी बियाणे निकृष्ट दर्जाचे मिळत आहेत.नाले,सांडपाणी,रस्त्याचे व्यवस्थापन ठीक नाहीये , हजारो करोड रुपये खर्चून केलेले रस्ते दोन महिनेही टिकत नाहीत, जिथे तिथे भ्रष्टाचार मारामारी अत्याचार अन्याय जातिवाद आणि धर्मवाद महाराष्ट्रामध्ये वाढलेला असताना सत्ता नसताना शेतकऱ्यांचा सातबारा तीन वेळा कोरा करणारा याच महाराष्ट्राचा सीएम सत्तेत आल्यावर आज पर्यंत शेतकरी कर्जमाफी करत नाही या आणि अशा अनेक प्रश्नांवर यांचे तोंड उघडत नाही परंतु निकृष्ट दर्जाचे काम केल्यावर सामान्य माणसाने उठवलेला आवाज यांचा महाराष्ट्र बदनाम करतो त्यांना मी सांगू इच्छितो, फडणवीस साहेब बदनाम तुम्ही आहेत माझा महाराष्ट्र अख्या देशाला आणि जगाला पुरून उरेल इतका समृद्ध आहे माझा महाराष्ट्र बदनाम कधीच होऊ शकत नाही, तुमच्यासारख्या लोकांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळेच तो बदनाम होत आहे आणि म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावं लागतं आणि ते जर सहन होत नाही तर निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल यव्हाना तुमच्याकडून ते घडल्याबद्दल नैतिकतेने तुम्ही राजीनामा द्यावा असे आव्हान डॉ वंजारे यांनी केले.
Comments
Post a Comment