जिल्हा परिषद ते नगरपालिका रस्त्याची शहर बचाव मंचने केली पाहणी

जिल्हा परिषद ते नगरपालिका रस्त्याची शहर बचाव मंचने केली पाहणी

बीड (प्रतिनिधी ) : अनेक वर्षापासून जिल्हा परिषद ते नगरपरिषद रस्त्यालगतच्या नाल्या व रस्ता हेतूपुरस्सर पणे दुर्लक्षित ठेवण्यात आलेला होता. हा रस्ता मुद्दामच का दुर्लक्षित ठेवण्यात आला त्यालाही अनेक कारणे आहेत. गेल्या दोन वर्षापासून सतत बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेमध्ये आजवर घेतलेल्या सर्वच बैठकांमधून निवेदने देऊन सातत्याने या रस्त्या साठी पाठपुरावा केलेला आहे. वारंवार या रस्त्याच्या दुरुस्तीची व रस्ता करण्याची मागणी लावून धरलेली आहे. नुकतेच बदलून गेलेले मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी मी हा रस्ता प्राध्यान्यक्रमाने मार्गी लावेल असे वारंवार आश्वासित केले होते. तरी या रस्त्याची व्यथा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे दिवंगत पालकमंत्री अजित दादा पवार यांच्यासमोरही मांडण्यात आली होती. बीड शहर बचाव मंचाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर व मुख्याधिकारी शैलेश खडसे यांनी केलेल्या सर्व कार्यवाहीनंतर या रस्त्यासाठी शासनाकडून निधी मिळवण्यात आला. बीड शहराला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. शहराला एखादी गोष्ट मिळाली तरी ती शहरातील नागरिकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी व मोठ्या संघर्षाने मिळत असते. दिनांक 4 जुलै 2026 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता बीड शहर बचाव मंचच्या वतीने बचाव मंचच्या टीम मधील काही सदस्यांनी व पत्रकारांनी जिल्हा परिषद ते नगरपालिका रस्त्याचे काम सुरू असताना जिल्हा परिषद समोरील सुरू असलेल्या रस्त्याची पाहणी करून सिताई कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी किरण शिंदे यांच्याशी कामाच्या दर्जाबाबत सविस्तर चर्चा केली असता, शासनाने रस्त्याच्या कामाबाबत दिलेल्या निर्देशानुसार निश्चितच या रस्त्याचे गुणवत्ता पूर्ण दर्जेदार काम करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी सिताई कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी दिली. यावेळी बचाव मंचचे अध्यक्ष नितीन जायभाये,ॲड.अनिल बारगजे, डॉ. संजय तांदळे, ॲड. नितीन वाघमारे, रिपाई सेना जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम गोटू वीर, अनिल कचरे, सिताई कास्ट्रक्शनचे प्रतिनिधी किरण शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी