तलवाडा पोलीस स्टेशन मधील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा आरोपी अटक नाही तर राष्ट्रीय महामार्ग बंद पाडू- नितीन सोनवणे
तलवाडा पोलीस स्टेशन मधील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा
आरोपी अटक नाही तर राष्ट्रीय महामार्ग बंद पाडू- नितीन सोनवणे
बीड प्रतिनिधी: गुन्हा रजि.क्र. ०१५३/२०२६ (पोलीस स्टेशन तलवाडा, ता. गेवराई) मधील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक न झाल्याने ऑल इंडिया पॅंथर सेनेने पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास २० जुलै २०२६ रोजी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.ऑल इंडिया पॅंथर सेना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक, बीड यांना दिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. पत्रात म्हटले आहे की, सदर गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम ७४, ७५, ७९, ३५२, ३५१(२), बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा (POCSO) कलम १२, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ च्या विविध कलमांखाली (३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(डब्ल्यू)(१), ३(१)(डब्ल्यू)(२), ३(२)(व्हीए) आदी) गुन्हा दाखल झाला आहे.सोनवणे यांनी पत्रात नमूद केले की, “गुन्हा नोंद झालेल्या इतक्या गंभीर प्रकरणात आरोपी आजतागायत अटक न झाल्याने पोलीस प्रशासनावरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास डळमळीत होत आहे.” त्यांनी पोलीस अधीक्षक यांना विनंती केली आहे की, गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी यांना द्यावेत. *आंदोलनाचा इशारा*
पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, आरोपींना अटक न झाल्यास ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने २० जुलै २०२६ रोजी सकाळी १२ वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात येईल. प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे नितीन सोनवणे यांनी म्हटले आहे.सदर प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकारच्या प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासन किती तत्परतेने कारवाई करते, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment