अंबाजोगाई बस स्थानकातील आगार प्रमुखांच्या ढीसाळ नियोजनामुळे अपघातांना निमंत्रण- भीमशक्ती, लोकजनशक्ती पार्टी


बीड प्रतिनिधी : अंबाजोगाई बस स्थानकात होणाऱ्या वारंवार अपघातांमुळे बस स्थानकातील नियोजना संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यातील प्रमुख कारण बस स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या गेट जवळ वाहनांची गर्दी रिक्षाची अवैध पार्किंग बस स्थानकातील नवीन काढलेल्या अवैध गाळ्यांमुळे होणारी गर्दी त्यामध्ये प्रामुख्याने रसवंती, मेडिकल जनरल स्टोअर अशा विविध दुकानांमुळे बस स्थानकात प्रवाशांना उभा राहण्यासाठी अपुरी जागा पडत आहे यामुळे आंबेजोगाई बस स्थानकात वारंवार अपघात होत आहेत.मागील आठ दिवसात बस ने चिरडल्यामुळे दोन व्यक्ती गंभीर जखमी झालेले आहेत गेल्या वर्षी बस अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. बस स्थानकाला महाराष्ट्र शासनाकडून मोठी जागा दिलेली असताना सुद्धा आगार प्रमुखांच्या नियोजन शून्यमुळे जवळपास एक एकर जागा झाडे लावण्यासाठी सोडली असून ती जागा सध्या पडीक स्वरूपात दिसत आहे. जर या पुढील जागेचे योग्य नियोजन केले तर अंबाजोगाई शहराचे बस स्थानक हे सुसज्ज स्वरूपाचे होईल याची आगार प्रमुखाने नोंद घ्यावी जर निवेदन देऊन सुद्धा यापुढे अपघात झाले तर भीमशक्ती तथा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने आगार प्रमुखांच्या तोंडाला काळे फासले जाईल याची नोंद आगार प्रमुखांनी घ्यावी. तसेच आगार प्रमुखांनी बस स्थानकात कमीत कमी तीन कर्मचारी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करावे अशी विनंती करण्यात येत आहे.
 यावेळी निवेदन देताना भिमशक्ती सामाजिक संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव सरवदे साहेब, लोक जनशक्ती पार्टी युवा चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे, युवा नेते विशाल पोटभरे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा संघटक जीवनजी घाडगे, लोक जनशक्ती पार्टी युवा जिल्हाध्यक्ष अशोक काळे, दया कांबळे,शुभम तरकसे,सुमित आवडे, संघर्ष इंगळे, फाय्याज कुरेशी, अण्णा कुचेकर,शाम भाऊ घडवे व इतर...

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी