जिल्हा परिषद ते नगरपालिका रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले
जिल्हा परिषद ते नगरपालिका रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले
बीड शहर बचाव मंचाच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश
शैलेश फडसे यांनी प्राधान्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला
बीड प्रतिनिधी : अनेक वर्षापासून जिल्हा परिषद ते नगरपरिषद रस्त्यालगतच्या नाल्या व रस्ता हेतूपुरस्सर पणे दुर्लक्षित ठेवण्यात आलेला होता. हा रस्ता मुद्दामच का दुर्लक्षित ठेवण्यात आला त्यालाही अनेक कारणे आहेत. गेल्या दोन वर्षापासून सतत बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेमध्ये आजवर घेतलेल्या सर्वच बैठकांमधून निवेदने देऊन सातत्याने या रस्त्या साठी पाठपुरावा केलेला आहे. वारंवार या रस्त्याच्या दुरुस्तीची व रस्ता करण्याची मागणी लावून धरलेली आहे. नुकतेच बदलून गेलेले मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी मी हा रस्ता प्राध्यान्यक्रमाने मार्गी लावेल असे वारंवार आश्वासित केले होते. तरी या रस्त्याची व्यथा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे दिवंगत पालकमंत्री अजित दादा पवार यांच्यासमोरही मांडण्यात आली होती. बीड शहर बचाव मंचाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर व मुख्याधिकारी शैलेश खडसे यांनी केलेल्या सर्व कार्यवाहीनंतर या रस्त्यासाठी शासनाकडून निधी मिळवण्यात आला. बीड शहराला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. शहराला एखादी गोष्ट मिळाली तरी ती शहरातील नागरिकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी व मोठ्या संघर्षाने मिळत असते. तरी या रस्त्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कुणी एका संधी साधू लोकप्रतिनिधीने करू नये. अजूनही बीड शहरामध्ये समस्यांचा मोठा ढीग लागलेला आहे. गतकाळामध्ये लोकांनी सहन केलेल्या हाल अपेष्टा व प्रदीर्घकाळ केलेला संघर्ष सर्वांनीच लक्षात ठेवावा व लोकप्रतिनिधींनी आपले भान शहरातील प्रश्नांविषयी जागेवर ठेवावे असे आवाहन या निमित्याने बीड शहर बचाव मंचाच्या वतीने सर्वांनाच करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment