हक्काने हमालाकडून काम करुनघेणारे शासन मजूरी देण्यासाठी उदासीनराजकुमार घायाळ यांचे उपोषण सुरु


बीड ( प्रतिनिधी  ) बीड जिल्ह्यातील 23 शासकिय धान्य गोदामा काम करणार्‍या हमालांना सहा महिन्यापासून मजूरी मिळाली नसल्याने त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. यासाठी 11 जुन ते 23 जून कामबंद आंदोलन केले तथापी मंत्रालयीन स्तरावर उदासीनता लक्षात घेवून कामबंद आंदोलन स्थगित करुन शासकिय धान्य गोदाम हमाल पंचायतने संघटनचे अध्यक्ष राजकुमार घायाळ यांच्या बेमूदत उपोषणाचा निर्णय घेतला तसे पत्र राज्याच्या पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव व जिल्हाधिकारी, बीड यांना देवून बीड सह राज्यात हमालीसाठी निधी उपलब्ध करुन दिला नाही तो तात्काळ द्यावा यासाठी आज दिनांक 1 जूलै 2026 पासून राजकुमार घायाळ यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरु केले राज्यात जेथे जेथे कंत्राटदारा शिवाय काम करुन घेतले जाते तेथे निधी उपलब्ध करुन दिलेला नाही त्यामूळे गेले 3 ते 6 महिन्यापासून हमालांना काम करुन मजूरी न मिळाल्याने हमालांची अवस्था दयनिय झालेली आहे.
या बाबतच्या निवेदनातील पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.केलेल्या कामाची मजूरी तात्काळ मिळावी,औरंगाबाद हायकोर्टाने  तीन वर्षापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे महागाई निर्देशांक देण्यात यावा,थेट वाहतूक धोरणामूळे राज्यातील दहा हजार हमाल बेरोजगार होवून नयेत यासाठी माथाडी कायद्यातील तरतूदीनूसार ज्या-त्या धान्य गोदामातील नोंदीत हमालाकडुनच थेट वाहतूकीतील धान्य हाताळणूकीचे काम करुन घेण्याचे बंधन वहातूक  कंत्राटदारावर घालण्यात यावे,तसेच झालेल्या कामाची मजूरी माथाडी मंडळाने निश्चीत केलेल्या हमाली दरानूसार लेव्हीसह देण्याचे बंधन कंत्राटदारावर घालण्यात यावे सदर उपोषणाची दखल न घेतल्यास बीड जिल्ह्यासह राज्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी