बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महामानव अभिवादन ग्रुप वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे पी.ई.एस. च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न 
 (बीड प्रतिनिधी) - " शिका संघटित व्हा संघर्ष करा" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुमोल उपदेश शिक्षणा पासून वंचित असलेल्या दीनदलित बहुजन करता केला होता. त्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टीने सखोल विचार करून उच्च शिक्षणाकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची आठ जुलै 1945 रोजी मुंबई येथे स्थापना केली होती. उच्च शिक्षण म्हणजे निर्भीड बनणे, प्रज्ञा शील करणे चा मार्ग स्वीकारून ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा उपयोग समाजातील उपेक्षित समाजाची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रगती कशी होईल, लवकरच तात्कालीन ब्रिटिश सरकारकडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा आपला देश एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य कसा घडेल हा तेव्हा अतिउच्च कोटीच्या देशाच्या हिताचा विचार करून उच्च शिक्षणाची सोय प्रथम 1946 रोजी मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन करून केली असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी लाभलेले प्रो.डॉ. उत्तम साळवे यांनी केले. तुलसी संगणक व माहितीशास्त्र महाविद्यालय सभागृहात महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचाल तर्फे आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले तर प्रास्ताविक जी.एम. भोले यांनी करून आपल्या प्रास्तविकात सागितलेकी पुढील वर्षी पी ई.एस. सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून पे बॅक टू सोसायटीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाज उपयोगी उपक्रम, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उपक्रम चांगल्या प्रकारे कसे राबवता येतील याबद्दल कृती कार्यक्रम ठरवून तसे नियोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता आतापासूनच संपर्क साधण्याचे काम सुरू केले आहे. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचार मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, विशेष सत्कारमूर्ती प्रा. प्रदीप रोडे, ज्येष्ठ पत्रकार, लोकाशाचे निवासी संपादक उत्तम हजारे, दैनिक समर्थ राजयोग चे संपादक वैभव स्वामी, प्रभारी माहिती अधिकारी मिलिंद तूपसमुद्रे, महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले, वाचाल तर वाचालचे डी.जी. वानखेडे, दशरथ मकासरे, प्रा. वसंत ओगले, यांच्या हस्ते आदर्शांचे पुष्प व पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण" हेच परिवर्तनाचे शस्त्र.... आणि त्या शस्त्राला धार देणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. प्रदीप रोडे व जेष्ठ पत्रकार निवासी संपादक लोकाशा जिल्हा प्रतिनिधी वृत्तपत्र सम्राटचे उत्तम हजारे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पी.ई.एस. च्या माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एस.एस.सोनवणे, डी.जी. वानखेडे , दशरथ मकासरे, ए.बी.जौजाळ, के.बी.गायकवाड, प्रा. वसंत ओगले, शिवाजीराव वावळकर, प्रकाश शिंदे सखाराम उजगरे, उमाजी वाघमारे प्रा.डॉ. आत्माराम झिंजुर्डे, अँड.डी.एम. विद्यागर, अँड.एस.एम.साळवे, वंदनाताई वाघमारे, मोहन गवई, प्रवीण टाकणखार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 वाचाल तर वाचाल वाचनालयाचे 44 केंद्र कार्यान्वित आहेत. या मोफत वाचनालय तर्फे सम्यक समबुद्ध विहार नागोबा गल्ली करिता 81 पुस्तकांचा संच मान्यवरांच्या हस्ते माजी नगरसेवक राजु जोगदंड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या संचातील पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे नम्र आवाहन करण्यात आले.

 विशेष सत्कारला उत्तर देताना प्रा. प्रदीप रोडे व वज्जी लोकांचा पराभव का होत नव्हता हे उदाहरण देऊ स्पष्ट आवाहन केले की पी.ई.एस च्या माजी विद्यार्थ्यांनी विधायक कार्याकरिता बॅक टू सोसायटी हा विचार करून व तरुणांचे सहकार्य घेऊन कार्य केले तर आपल्या बीड जिल्ह्यात विविध समाज उपयोगी कार्य पार करणे काहीही कठीण नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाच्या व देशाच्या हिताचे जे कार्य केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने कार्य करणे सद्यपरिस्थितीत कसे गरजेचे आहे हे स्पष्ट केले. पी.ई.एस च्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने त्या काळातील शिक्षणात आलेले कठीण प्रसंग सांगितले. प्राध्यापक वसंत ओगले यांनी नागसेने परिसरात घेतलेल्या शिक्षणाचा परिणाम, जडणघडण व त्यांच्या उर्वरित जीवनात करीत असलेले कार्य व पुढे काय करायचे याचा लेखा- जोखा माडला. व सर्वांना कृती कार्यक्रम करण्यास उपस्थितांना प्रवृत्त केले. पि.व्ही बनसोडे यांनी खंत व्यक्त केले की ते पीईएस चे विद्यार्थी नव्हते तरीपण ज्या ठिकाणी उच्च शिक्षण घेतले तेथे फुले, शाहू,आंबेडकर यांचे विचार न विसरता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि श.प.च्या पदावरुन कार्य करीत असताना सर्वसामान्यांचे हित करणे हे डोळ्यासमोर ठेवून कायदेशीर चौकटीत राहूनच कार्य केले.
 सुभाष साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्यांच्या मनामध्ये क्रांतीज्योत पेटवली आहे, ती सतत जागृत कशी राहील हे करण्याचे कार्य सेवानिवृत्त माजी विद्यार्थ्यांच्या दीर्घ अनुभवातून व त्यांनी केलेल्या विविध पदावरून सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, तथागतांच्या सांगितलेल्या प्रज्ञा शील करुणा या आचरण करून अनुभवाच्या आधारे ही समाज हिताची ज्योत सतत जागृत कशी राहील त्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. वैभव स्वामी नी सांगितले महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचाल च्या सामाजिक उपक्रमाबद्दल वृत्तपत्राच्या माध्यमातून सतत पाठीशी राहतील. अध्यक्षीय समारोपात साळवे म्हणाले की विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी " माझ्या मते पी ई.एस सोसायटी ची स्थापना व ध्येयधोरणे education for fearless, देशातील नागरिक प्रचंड दबावाखाली आहेत. भीती घालण्याचे काम शिक्षणातून झाले पाहिजेत शिक्षणातून नैतिक मूल्य जोडले गेले पाहिजे म्हणजे सुजाण नागरिक घडवल्या जातील तसेच एकत्र या व संघटित व्हा आणि आपले अधिकार ओळखा जो पर्यंत अधिकार माहित होत नाहीत तोपर्यंत प्रयत्न केला जात नाही. अधिकार मिळवण्याकरता संघर्ष केला पाहिजे व संविधानिक मार्गाने हक्क मिळवले पाहिजे. या सर्व बाबींच्या पुरती करता उच्च शिक्षणाची गरज ओळखून मुंबई बरोबरच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी विशेषता छत्रपती संभाजीनगर येथे पी.ई.एस सोसायटीची सुरुवात केली. ज्या भागात उच्च शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते, तरी या सर्व मुद्द्यांचा विचार करून आपली वाटचाल तशी असणे किती गरजेचे आहे. हे उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. कार्यक्रमास कॅप्टन राजाभाऊ आठवले , अशोक ठोकळ, पी आय साबळे,भास्करराव सरपते, प्रशांत वासनिक अँड.तेजस वडमारे, अँड.राजेश शिंदे प्रा.राम गायकवाड, रघुनाथ शेवाळे कल्याण भंडारे, उमाजी आठवले, राहुल जाधव, कुमारथ पारवे, अंकुश कोरडे, सुनील डोंगरे, प्रा. घाडगे, राजेंद्र भोले, गंगाधरे, मंदाताई मस्के,वैशाली शिंदे, शोभा आठवले, पंचशीला सरपते, डी.जी. तांदळे, मुक्त पत्रकार युसुफ अरविंद डोळस, कचरू भोले, प्रा. शिवाजी दिवाण, पांडुरंग घोडेराव यांची उपस्थिती होती.
 यशवंत वासनीक, हॅपी वासनिक, बी.जी. दळवी, बि.डी. तांगडे यांनी कार्यक्रम यशस्वीते करिता बहुमोल परिश्रम केले.

 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत वसमिक यांनी व्यक्त केले. थायलंड येथे अपघातात निधन झालेल्या 9 बौद्ध भिक्खु यांना दोन मिनिटात स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शरणातयेणे कार्यक्रमाची सांगता करण्यात झाली

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी