आठ महिन्यांपासून वेतन थकीत; वैद्यनाथ विद्यालयाच्या शिक्षकांचे 6 जुलै पासून आमरण उपोषण
आठ महिन्यांपासून वेतन थकीत; वैद्यनाथ विद्यालयाच्या शिक्षकांचे 6 जुलै पासून आमरण उपोषण
बीड | प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ विद्यालय, माध्यमिक विभागातील शिक्षकांचे मागील आठ महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने संतप्त शिक्षकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी सोमवार, दि. ६ जुलै २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे आमरण उपोषण जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कार्यालय, बीड येथे होणार असून, शिक्षकांनी प्रशासनाकडे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याची प्रमुख मागणी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे शिक्षकांनी सांगितले.
"शिक्षकांचे थकीत वेतन त्वरित अदा करण्यात यावे" हीच आमची प्रमुख मागणी असून, "न्याय मिळाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नाही," असा निर्धार समस्त शिक्षकवृंदाने व्यक्त केला आहे.
या आंदोलनात वैद्यनाथ विद्यालय, माध्यमिक विभाग, परळी वैजनाथ येथील सर्व शिक्षक सहभागी होणार असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment