मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा,तहसील प्रशासनाचे आभार - भागवत गीते
मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा,तहसील प्रशासनाचे आभार - भागवत गीते
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
मलकापूर (ता. परळी वैजनाथ) येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवून वहिवाटीचा रस्ता खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर,तहसीलदार विनोद रणवरे, यांनी महसूल प्रशासनाला दिले होते. त्याप्रमाणे आठ जुलै रोजी शेत रस्त्यावरील अतिक्रपणे काढण्यात आली. याप्रकरणी नायब तहसीलदार परवीन पठाण, नायब तहसीलदार सुरवसे , मंडळ अधिकारी उमेश कुडदे, ग्राम महसूल अधिकारी सज्जा मलकापूर अर्चना गोरे याबाबत ३० जून २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र जारी करण्यात आले होते .
मौजे मलकापूर येथील सर्व्हे क्रमांक ३३२/१, ३३२/३, ३३३, ३३५, ३३६ व ३३७ या शेतजमिनींना जाणारा वहिवाटीचा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याची तक्रार अर्जदार भागवत रामकिशन गिते यांनी केली होती. त्यामुळे शेतात ये-जा करणे व शेतीची कामे करणे अडचणीचे झाल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.
यापूर्वी शासन निर्णय तसेच संबंधित कार्यालयाच्या पत्रानुसार रस्ता मोकळा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. प्रभावी कार्यवाही झालेली दिसत आहे. तहसीलदारांनी पुन्हा आदेश जारी करत रस्ता दोन वर्षापासून रस्ता अतिक्रम मुक्त केला आहे.
या आदेशानुसार नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी व संबंधित तलाठी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ८ जुलै २०२६ रोजी अतिक्रमण हटवून शेतरस्ता मोकळा केला आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केला.
या कारवाईमुळे संबंधित शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचा मार्ग उपलब्ध झाला असून, महसूल प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षानंतर रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल भागवत गीते यांनी तहसील प्रशासन, महसूल प्रशासन, ग्रामीण पोलीस प्रशासन आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment