आम्हाला धमक्या देवू नका टीईटी पेपरफुटी संबंधित 12 मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा दादा भुसेंच्या घरासमोर आंदोलन करू - सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा
आम्हाला धमक्या देवू नका टीईटी पेपरफुटी संबंधित 12 मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा दादा भुसेंच्या घरासमोर आंदोलन करू - सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा
मुंबई११(प्रतिनिधी)सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून 1 जुलै रोजी टीईटी पेपरफुटीच्या विरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील घरासमोर आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दादा भुसे यांच्या निवासस्थानी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत टीईटी पेपरफुटी संबंधित 12 मागण्याच्या चर्चा करून निवेदन दिले त्यापैकी टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून करण्यात आली.
आठ दिवसांत मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा दादा भुसे यांच्या घरासमोर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता.
पण दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांकडून सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना पुन्हा दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलनाने आले तर मारण्याची धमकी दिली आहे. याच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठासमोर दादा भुसेंच्या पोस्टला काळे फासण्यात आले.
सम्यक विद्यार्थी आंदोलन दादा भुसे घरात असताना त्यांच्या घराला कुलूप लावण्याची टाकत आम्ही ठेवतो आम्हाला अशा धमक्या देवू नका असे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या समोर आंदोलन करून इशारा दिला.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कल्याण डोंबिवली महानगराध्यक्ष कमलेश उबाळे, आनंदराज घाटगे, पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment