धानोरा रोड ते राजू नगर–अंकुश नगर–लोकाशा नगर रस्त्याची दुरवस्था; दुरुस्ती कधी होणार?

धानोरा रोड ते राजू नगर–अंकुश नगर–लोकाशा नगर रस्त्याची दुरवस्था; दुरुस्ती कधी होणार?

कॅनॉल रोडवरील अतिक्रमण व बेकायदेशीर विक्रीविरोधात आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा

बीड (प्रतिनिधी) – बीड शहरातील धानोरा रोड ते राजू नगर, अंकुश नगर, लोकाशा नगर मार्गे जुना चराटा रस्त्यापर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत खराब व धोकादायक झाला असून, नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती कधी होणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पालवन–अंकुश नगर–कालिका नगर–लोकाशा नगर मार्गे तळेगावकडे जाणाऱ्या कॅनॉल रोड परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व बेकायदेशीर प्लॉट विक्री सुरू असल्याची गंभीर तक्रार आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
पाटबंधारे विभागाच्या जागेवर तसेच ओपन स्पेस म्हणून राखीव असलेल्या सरकारी जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीर कब्जा करून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करत प्लॉट विक्री सुरू केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही खाजगी जमीनमालक व भूमाफिया संगनमताने नियमबाह्य रस्ते काढत शासनाच्या नियमांचे उघड उल्लंघन करत असल्याचेही समोर आले आहे.
याशिवाय, पालवन व बीड शिव रस्त्यावरही अशाच प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार सुरू असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे.
बिंदुसरा धरणावरून येणारा कॅनॉल पूर्वी पालवन–बीड मार्गे तळेगावकडे जात होता. मात्र वाढत्या वस्तीमुळे या कॅनॉलचे रूपांतर रस्त्यात करण्यात आले आहे. काही ठिकाणी ६६ फूट रुंदीचे रस्ते विकसित करण्यात आले असताना, संबंधित कॅनॉल रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून जागांची विक्री करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
या सर्व प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून अतिक्रमणे हटवावीत, बेकायदेशीर व्यवहार रद्द करावेत, दोषींवर फौजदारी कारवाई करावी तसेच धानोरा रोड ते लोकाशा नगर परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांना मुख्य अधिकारी नगरपरिषद बीड यांना केली आहे.
अन्यथा, नगरपरिषद कार्यालयासमोर आम आदमी पार्टीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे शहराध्यक्ष सय्यद सादेक जिल्हा कोषाध्यक्ष कैलास चंद पालीवाल शहर सचिव मिलिंद पाळणे बाजीराव ढाकणे तालुका उपाध्यक्ष आजमखान इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी