भिम अनुयायांच्या जीवितास धोका निर्माण करणारे गणेश पगारे, किरण देशमुख,, प्रमोद माने यांना तात्काळ निलंबित करा-ॲड विकास जोगदंड


बीड (प्रतिनिधी)14 एप्रिल 2026 रोजी विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्सवात पार पडली असून नित्यनियमाने व परंपरागत सायंकाळी 6 तें 12 पर्यंत 
 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तें बशीर गंज चौक मार्गे तें माळवेस तें डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात येते 
मिरवणुकीत हजारो च्या संख्येने भिम अनुयायी समाजातील माता, भगिनीं, बांधव यांचा सहभाग असतो तसेच वृद्ध, बालक देखील जयंती उत्सवात सहभागी होतात 
परंतु नगर परिषद स्वच्छता विभागाचे प्रमुख गणेश तुळशीराम पगारे, 
यांनी त्या मार्गावरील स्वच्छतेच्या बाबतीत कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याने तसेच 
बांधकाम विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी मिरवणूक मार्गातील खड्डे बुजविण्यासाठी केवळ कच्चखडी टाकून पसरविल्याने अनेक दोन चाकी वाहन चालक, पदाचारी घसरून पडल्याने जखमी झाले आहेत. 
ही अतिशय गंभीर बाब असून 
गणेश पगारे, किरण देशमूख, तसेच 
पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रमोद माने यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांनी जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केल्याने जयंती उत्सवाच्या कालावधीत मिरवणुकी दरम्यान जल-वाहिका (पाईपलाईन),अथवा वालमधील पाणी प्रचंड दाबाने सोडल्यामुळे कचऱ्याने तुडुंब भरलेल्या गटारातील सांड पाणी रस्त्यावर येऊन 
जयंती उत्सवातील मार्गास गटार डोहाचे स्वरूप आले असल्याने मिरवणूकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच साचलेल्या घाण पाण्यामुळे माता, भगिनीं, बांधव, वृद्ध, बालक, भिम 
अनुयायांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
तसेच मिरवणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असल्याने त्या महामानवांच्या प्रतिमेंचा अप्रत्यक्षपणे सदरील कर्मचाऱ्याकरवी अवमान झाला असल्यानें व 
कर्तव्यात कसूर 
केल्यामुळे स्वच्छता विभागचे प्रमुख गणेश पगारे,
बांधकाम विभागाचे अभियंता किरण देशमुख, 
पाणी पुरवठा विभागाचे प्रमोद माने यांना तात्काळ निलंबित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांचे सह 
ॲड मिलिंद वाघमारे,मंगेश जोगदंड,सत्यभान जाधव,राजेश कोकाटे
,महादेव वंजारे,विष्णू गायकवाड,आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे


         
इंजि प्रमोद माने 
इंजि किरण देशमुख यांना जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गाची पूर्व कल्पना असून देखील त्यांनी जातीय द्वेषी मानसिकतेने
 मिरवणूक मार्गावर 
कच्चखडी टाकून हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी माजी नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी केली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी