मनमाड-नांदगावच्या जनतेसाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांची दिल्लीत धडपड; वाहतूक कोंडीमुक्त भविष्यासाठी मोठा निर्णय



यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची भेट घेऊन मनमाड शहरातील वाढत्या अपघातांची व भीषण वाहतूक कोंडीची परिस्थिती अत्यंत संवेदनशीलतेने त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

मनमाड, मालेगाव, येवला व कोपरगाव या मार्गांवरील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः मनमाड ते येवला मार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी इतकी गंभीर आहे की, अनेक वेळा रुग्णवाहिका देखील अडकून पडतात आणि जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या रुग्णांना अमूल्य वेळ गमवावा लागतो — ही वेदना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत मांडली.

याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग 752G (मालेगाव–मनमाड–येवला–कोपरगाव) मार्ग मंजूर होण्यासाठी निवेदन सादर करून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पाऊल उचलले.

आमदार कांदे यांनी मांडलेले सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत मा. गडकरी साहेबांनी तात्काळ संबंधित प्रशासनाला सूचना देत —

मनमाड शहरात फ्लायओव्हरचे काम तातडीने सुरू करावे

भविष्यातील नव्या रस्त्यांमध्ये शहरातील आवश्यक त्या ठिकाणी फ्लायओव्हरचा समावेश करावा अशा स्पष्ट व निर्णायक सूचना दिल्या.

त्याचवेळी मतदारसंघातील इतर विकासकामांचाही आढावा घेण्यात आला असून, खामगाव शहरातील बायपास प्रकल्पालाही गती देण्याचे निर्देश मा. गडकरी साहेबांनी प्रशासनाला दिले.

ही भेट केवळ एक औपचारिकता नव्हती, तर मनमाड-नांदगावच्या जनतेच्या वेदना, अडचणी आणि सुरक्षिततेसाठी केलेली एक जिव्हाळ्याची धडपड होती. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या जीवाची काळजी घेत, त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी हे कर्तव्य पार पाडले आहे.

लवकरच मनमाड व येवला येथील जनतेला वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळून मोकळा श्वास घेता येणार आहे, अशी आशा या भेटीतून निर्माण झाली आहे.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान, धनंजय कांदे, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी