समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : शिर्डी येथील शेळके दांपत्याचा मृत्यू




( यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक)

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर धोत्रे परिसरात (दि. १७ एप्रिल) रोजी संभाजीनगरकडून शिर्डीकडे येत असताना भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेत शिर्डी येथील जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोपरगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगातील वाहनाने महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आणि घटनास्थळीच दाम्पत्याचा मृत्यू झाला.


मृत जितेंद्र शेळके हे भोंदू बाबा खरात यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघाताचे नेमके कारण तसेच कंटेनर रस्त्यावर का उभा होता याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शिर्डी परिसरात शोककळा पसरली असून शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी