खालापूरी परिसरात हरणांचा धुमाकूळ, वनविभागाने तात्काळ लक्ष द्यावे-डॉ जितीन वंजारे


  बीड प्रतिनिधी :-औंदाच्या वर्षी पावसाळा पुढे ढकलल्या कारणाने पीक पेरणी उशिरा झालेली आहे त्यातच काही शेतकऱ्यांच्या कडे थोडेफार पाण्याची उपलब्धता असल्याकारणाने वेळेवर कापसाचे उत्पन्न घेतले गेले आहे परंतु हरणाच्या कळपांनी राणच्या रान खाऊन टाकले आहेत. ठिबक सिंचनावर तळहातातील फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचे अतोनात नुकसान हरणाचे कळप करत आहेत खालापुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या परिसरामध्ये राहुल मुंडे यांनी सांगितले की माझ्या शेतातील सर्व पीक हरणांनी खाल्ले आहे. वनविभाग गाढ झोपेत असून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कोण भरून देणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात मा तहसीलदार साहेब आणि वनविभाग कार्यालयाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचे आव्हाहन या प्रसिद्धीपत्रकाद्वारे डॉ जितीन वंजारे यांनी केले आहे.

Comments