परवडत नसल्याने खरिप लागवडीक्षेत्रात घट ?नागली,वरई दिवसेंदिवस दुर्मिळ?

परवडत नसल्याने खरिप लागवडीक्षेत्रात घट ?नागली,वरई दिवसेंदिवस दुर्मिळ? 
नाशिक जिल्हा प्रतिनिधी - नवनाथ गायकर यांजकडुन 

   निसर्गाचा लहरीपणा, खते, औषधाचां वाढता खर्च, न परवडणारी मजुराचीं मजुरी,यांत्रिकी खर्च करुन व चार महिने वारा,पाऊस पाण्यात राबुनही खरीप पिकास योग्य दर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात खरिप पिकाच्यां भात, नागली व वरई च्या लागवडीत मोठया प्रमाणावर दिवसेंदिवस घट होत चालली आहे. 
  इगतपुरी तालुका हा महाराष्ट्रात पावसाचे माहेरघर म्हणुन ओळखला जातो आहे.भरपुर पावसामुळे येथे भात पिकास अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे भात हे येथील प्रमुख पीक असुन त्या खालोखाल नागली व वरई ही पिकवली जाते.
  दरम्यान भातामुळे या तालुक्याची ओळखच भाताचे आगार म्हणुन प्रसिद्ध आहे.येथील तांदुळ, मुरमुरा व पोहा संपुर्ण महाराष्ट्र भर परिचीत आहे.
  भातासह नागली, वरई ही खरीप पिकेही येथे मोठयाप्रमाणात घेतली जातात.
  मात्र पाण्या पावसात, वादळ वार्यात कष्ट करुन पिकवलेल्या भातासह खरीप पिकानां किमान उत्पादन खर्च भरुन निघेल इतकाही दर वा पैसा मिळत नाही ही वस्तुस्थिति आहे. 
  ज्या इगतपुरी तालुक्यास भाताचे आगार म्हटले जाते त्या भातास अत्यल्प भाव मिळतो.व्यापारी वर्ग तर मातीमोल भावाने भात खरेदी करतात.याशिवाय परराज्यातुन कमी किंमतीत भात आणला जातो.त्यामुळे इथल्या पिकाचा दर पाडुन मागितला जातो.भांडवल खर्च व इतर अडी अडचणी साठी नाईलाजाने शेतकर्यास व्यापारी मागेल त्या दरात भात विकावा लागतो.
  याच भाताचा तांदुळ बनवुन तो देशभर विकुन व्यापारी मात्र गब्बर झाले आहेत तर कष्ट करणारा शेतकरी कष्ट करुनच मरत आहे.
  दरम्यान यातही बियाणे, खते, औषधे व मजुरीसह नांगरणी, वखरणीसाठी यांत्रिक औजारे आदिचा भरमसाठ खर्च न पेलवणारा आहे.
  या शिवाय लहरी निसर्गामुळे पिकाचीही कधी कधी नासाडी होते.
  या सगळया अपार कष्टातुन कमावलेल्या चार महिन्याच्या पिकास रास्त भावच मिळत नाही.त्यामुळे ही भातशेती दिवसेंदिवस आतबट्टयाची होत चालली आहे. 
  तोटयात असणार्या भातशेती मुळे अनेकानीं आता भाता ऐवजी सोयाबीन लागवडीचा पर्याय स्विकारला आहे तर काहीजण चार महिने जमिन बागायती पिकासाठी पडिक ठेवणेच पसंत करत आहे.
  बरेचसे शेतकरी स्वत:पुरते भात पिकवुन अन्य पर्यायी पिके उर्वरीत जमिनीवर घेतानां दिसत आहे. 
  रक्तवाढीसाठी अत्यंत गुणकारी मानली जाणारी नागली हे पीक दिवसेंदिवस आता दुर्मिळ होत चालले आहे. पुर्वी घराघरात जेवणात सकाळ संध्याकाळ नागलीची (कुणी नाचणी ही म्हणतं.) भाकर असायची.मात्र आता औषधालाही नागली मिळेनाशी झाली असुन यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या सुरु झाल्या आहेत. 
  वरई हे उपवासासाठी पोषक व सात्विक मानले जाणारे पीकही आता या भागात फारसे कोणी घेतानां दिसत नाही.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी