पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १२ वर्षांत रामराज्याची संकल्पना साकारली – भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख

बीड, प्रतिनिधी : बीड येथील सोमेश्वर महादेव मंदिरात सुरू असलेल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज रामायण पारायणाच्या पावन प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सलग १२ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल भगवान श्रीरामचंद्रांचे विशेष पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि राष्ट्रसेवेच्या संकल्पांना अधिक बळ प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना श्रीराम चरणी करण्यात आली.

यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने विकास, सुशासन, राष्ट्रीय सुरक्षा, गरीब कल्याण आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे. प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मोदी यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.”

देशमुख म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत, पीएम किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी गरीब, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले आहे. तर दुसरीकडे राम मंदिर उभारणी, काशी विश्वनाथ धाम, महाकाल लोक आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी घेतलेले निर्णय हे देशाच्या सांस्कृतिक अस्मितेला नवे बळ देणारे ठरले आहेत.

“जागतिक पातळीवर भारताचा सन्मान वाढविणे, आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत करणे, पायाभूत सुविधांचा विक्रमी विकास, डिजिटल क्रांती आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवून राबविलेल्या योजनांमुळे मोदी यांचे नेतृत्व देशासाठी प्रेरणादायी ठरले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उपस्थित भाविकांसमोर मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध जनकल्याणकारी, विकासाभिमुख आणि राष्ट्रहिताच्या उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. तसेच प्रभू श्रीरामांची कृपा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत राष्ट्रावर सदैव राहो, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथआण्णा शिराळे, बीड शहराध्यक्ष अशोक लोढा, ज्येष्ठ नेते प्रा. देविदास नागरगोजे, पत्रकार प्रमोद पुसरेकर, राजेंद्र चरखा यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

“जय श्रीराम…!” या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय व राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी