पाटोदा मांजरसुबा मार्गावर रस्त्याला मोठ्या भेगा; टोल वसुलीवर नागरिकांचा संताप, ईश्वर माने यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा


पाटोदा (प्रतिनिधी) :
पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही ते मांजरसुबा या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून वैद्यकिन्ही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची अशी गंभीर अवस्था असतानाही काही टोल/शुल्क वसुली सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास सामाजिक कार्यकर्ते ईश्वर माने यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनीही या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी