भीमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - पुरुषोत्तम वीर
भीमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - पुरुषोत्तम वीर
बीड प्रतिनिधी : सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि बहुजन समाजाच्या एकतेच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या "उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषद" या महत्त्वपूर्ण परिषदेस बहुजन समाजातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने मराठवाड्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (गोटू) वीर यांनी केले आहे.
ही परिषद दि. 07 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
देशभरात अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा चर्चेत असताना बहुजन समाजाच्या हक्कांवर गदा येऊ नये आणि संविधानिक अधिकारांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने या संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत उपवर्गीकरणाच्या परिणामांवर सखोल चर्चा होणार असून समाजाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण दिशा ठरविण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. भिमराव आंबेडकर आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे समाजबांधवांना मार्गदर्शन करणार असून सामाजिक, राजकीय आणि संविधानिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे बहुजन समाजातील युवक, विद्यार्थी, महिला, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिषद यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेली ही परिषद बहुजन समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.उपवर्गीकरण होऊ देणार नाही.
Comments
Post a Comment