प्रथा की दिखाव्याचा बाजार, घेत आहेत कित्येक जीव
प्रथा की दिखाव्याचा बाजार, घेत आहेत कित्येक जीव-
मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाज म्हणून सर्वांचा बदलायला हवा जन्म दिल्यानंतर अनेक प्रसंगांना या स्त्री जातीला तोंड द्यावं लागतं जन्म दिल्यापासून मरेपर्यंत मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाज म्हणून सर्वांचा बदलायला हवा जन्म दिल्यानंतर अनेक प्रसंगांना या स्त्री जातीला तोंड द्यावं लागतं जन्म दिल्यापासून मरेपर्यंत तिची सुरक्षिततेची चिंता आहेच शिक्षण हुंडा समाजातील देवाण-घेवाण प्रथा या वाढल्या आहेत याला जबाबदार आपणच आहोत त्याचबरोबर शासनाच्या प्रशासनाच्या डोळे झाक भूमीमुळे स्त्रीभ्रूणहत्येचे कत्तलखाने वाढले आहे आज कित्येक मुलांना बायका मिळत नाही समाजाने याकडे डोळे झाक करून चालणार नाही आणि यामुळेही पुन्हा महिला अत्याचाराच प्रमाण वाढल आहे.
लग्न समारंभ धोंडे जेवण दिवाळी अनेक उत्सव सण समारंभ अशा आहेत जिथे नाही त्या प्रथा घुसडल्या जातात या उत्सवांचे प्रथमच महत्व कमी होऊन फक्त दिखावा पनाचा बाजार मांडला आहे सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल करतात आणि आपणच आपल्या मुलींचे या मुलींच्या आई बापाचे गुन्हेगार होत चाललो आहे. अशा प्रथांना खतपाणी घालू नका सोशल मीडियावर कसे धोंडे जेवण केले कसा दिखाऊपणाचा बाजार केला नका प्रसार करू समाजाच्या दैनीय अवस्थेकडे आपण स्थित्यंतर करत आहोत ,नाही त्या प्रथा घालून घुसडून महिला अत्याचाराचे प्रमाण वाढवत आहोत ऐपतीप्रमाणे नक्कीच या जावयाचा मान पान हाऊस करा पण त्याला मर्यादा असाव्यात.
जबाबदारी समाजाची आहे, नका करू हा दिखाऊ बाजार यामुळे कित्येक मुलींच्या बापाची कंबरड मोडण्याची वेळ आली आहे आणि पुन्हा या प्रथांच ओझं मुलीच्या आई-वडिलावर येत सासरवाडीच्या लोकांनाही या प्रथांची चढाओढ लागते ज्यांची आर्थिक परिस्थिती सदन आहे त्यांनी या प्रथांचा नुसता पेव फोडला आहे त्यामुळे आर्थिक टंचाईग्रस्त कुटुंबांना याची झळ पोहोचल्याशिवाय राहत नाही पुन्हा एकदा याचं मुलीच्या आई-वडिलांना सहन करावं लागतं हा सर्व पिक्चर डोळ्यासमोर दिसतो समाज म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा कधी विचार करणार आहोत मुलं 40 -45 वर्षाची आहे यांना बायका मिळत नाही याचं कारण फक्त प्रशासन असू शकते का ? अशाच काही समस्या आणि कारणांमुळे दिवसा गणीक अनेक स्त्रीभ्रूणहत्या ज्याची गिनती होऊ शकत नाही झाल्या आहेत, होत आहेत.
सासर माहेर दोन्हीची जबाबदारी आहे मुलीला आर्थिक दृष्टीने सक्षम करा मानसिक दृष्टिकोनातून बळकटी द्या मुलगी आहे म्हणून माहेराकडून अपेक्षा करण्याची ही भिकार मानसिक अवस्था सोडून दिली पाहिजे जेणेकरून मुलगी ओझं न वाटता सामाजिक मानसिक आर्थिक स्थैर्याचं केंद्रबिंदू आहे याची जाण निर्माण झाली पाहिजे मुलींची संख्या कमी म्हणून व्यस्त प्रमाणात बिना लग्नाची पोर आणि त्यांच्या समस्या हा विषय आणखीन वाढीस लागतो पहा विचार करून 🙏
✍️अनिता भोसले
Comments
Post a Comment