घोटी येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा राज्यस्तरीय अभ्यास वर्ग
नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ गायकर यांजकडुन
ग्राहक हक्क, ग्राहक संरक्षण कायदे तसेच विविध शासकीय सेवांबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरीय एकदिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन शनिवार, १३ जून रोजी सिन्नर फाटा येथील मातोश्री हॉस्पिटल सभागृहात करण्यात आले आहे.
या अभ्यास वर्गासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच , , ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष , राज्य सचिव , जिल्हाध्यक्ष , जिल्हा पुरवठा अधिकारी, आजी -माजी आमदार यांच्यासह ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, संघटक, सचिव, जिल्हा सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या अभ्यास वर्गामध्ये ग्राहक संरक्षण कायदा, लोकसेवा हक्क कायदा, ऑनलाइन फसवणूक प्रतिबंध, सार्वजनिक वितरण व्यवस्था, ग्राहक तक्रार निवारण प्रक्रिया तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, सदस्य, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा सहसचिव गोपाळ शिंदे व तालुका संघटक सुनील पाहाडे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment