कामगार राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक संपन्न-भाई गौतम आगळे सर
मुंबई ( प्रतिनिधी ) विस्तारित मंत्रालय कक्ष 319 कामगार राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली तर स्वाभिमानी महानिर्मिती कृती समितीचे संयोजक तथा मार्गदर्शक कॉम्रेड नचिकेत मोरे उपाध्यक्ष तथा रोजंदारी मजदुर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या उपस्थितीत नुकतीच संयुक्त बैठक संपन्न झाली, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
बैठकीमध्ये स्वाभिमानी महानिर्मिती कृती समिती यांनी घेतलेले कामगार हिताचे विषय:- राज्यातील कंत्राटी कामगारांना 1983 पासून मागिल ४३ वर्षे ५ टक्के दराने तूटपुंजा घर भाडे भत्ता दिला जातो, याबाबत तत्कालीन कामगार मंत्र्याशी चर्चा झाली त्यांनी आश्वासन दिले होते की घर भाडे भत्ता वाढवला जाईल आज राज्यातील किमान वेतनाचे दर हे सर्वसाधारणपणे दहा ते बारा हजार इतके आहेत या रकमेवर पाच टक्के दराने आजच्या महागाईच्या काळात कंत्राटी कामगारांना रुपये ६०० ते ७०० पर्यंत घर भाडे मिळत आहे, पण ते वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. २९/०९/२०२५ रोजी झालेल्या मीटिंगमध्ये 40% घर भाडेची तरतूद करता येईल असे आश्वासन दिले होते, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घनकचरा व्यवस्थापन (स्वच्छता दूत) कंत्राटी कामगारांना किमान वेतनात वाढ देण्याबाबत मसुदा सूचना शासनाने २०२५ रोजी प्रसिद्ध केली. त्याला एक वर्ष झाले परंतु अद्याप अधिसूचना प्रसिद्ध केली नाही ती तात्काळ करावी, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना मागे 25 ते 30 वर्षापासून किमान वेतन मिळत नाही, मुख्य अभियंता व स्थानिक कंत्राटदार यांची मिली जुली असल्यामुळे कंत्राटी कामगारांचे भयानक शोषण होत आहे, ते तात्काळ थांबावे, पारस औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना परिमंडळ २ चे वेतन फार कमी कामगारास दिले. परंतु परिमंडळ २ वेतनाची थकबाकी ऑक्टोबर २०२५ पासून दिली ती २०१९ पासून देय असताना दिली जात नाही, ती तात्काळ देण्यात यावी, महानिर्मिती चंद्रपूर,खापरखेडा, कोराडी, भुसावळ, नाशिक, पारस व परळी वैजनाथ अशा सर्वच पावर स्टेशनमध्ये कॉल सॅम्पलिंगचे काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना १९ टक्के मूळ वेतनात वाढ फरक अजून पर्यंत दिला नाही, तसेच एप्रिल २०२४ पासूनची थकबाकी दिली नाही, ती तात्काळ देण्यात यावी, इत्यादी प्रमुख मागण्यासह इतर मागण्या करण्यात आल्या दिनांक २ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त संघटनेला लवकरात लवकर देण्याचे निर्देश कामगार राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले सदरील बैठकीला महानिर्मिती व कामगार विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर स्वाभिमानी महानिर्मिती कृती समितीचे संयोजक तथा मार्गदर्शक कॉम्रेड नचिकेत मोरे, उपाध्यक्ष तथा रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर, रोशन गोस्वामी, नितेश तायडे, मनोज चौधरी, मनोहर अवचार यांच्यासह राज्यातील औष्णिक केंद्रातील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली.
Comments
Post a Comment