वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्या सोडवा- सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी
बीड : अंबाजोगाई स्वाती शासकीय रुग्णालयात अनेक विभागात वेगवेगळ्या समस्या रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना भासत आहेत याच संदर्भात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता श्री धपाटे सर व सर्व विभाग प्रमुखांचे बैठक घेतली यामध्ये प्रामुख्याने लेबर रूम चा विषय घेण्यात आला संबंधित विभागात इन्फेक्शन होत असल्यामुळे अनेक मातांना व जन्मलेल्या बाळांना त्याचा धोका निर्माण होत आहे लेबर रूमसाठी जवळपास पाच ते सहा वार्डांची आवश्यकता असताना फक्त दोनच वार्डामध्ये हा विभाग चालवला जातो या विभागात बीडची संख्या वाढवण्यात यावी तसेच अनेक तपासण्या पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून आणायला सांगितले जाते त्याच तपासण्या जर अद्यावत मशनरी आणून रुग्णालयातच झाल्या तर संबंधित पेशंटची होणारी गैरसोय थांबेल शासकीय रुग्णालयाने यासाठी प्रयत्न करून अशा अद्यावत मशनरी शासनाकडे मागून घ्याव्यात तसेच रुग्णालयातील रुग्णांना 70 टक्के औषध गोळ्या बाहेर मेडिकलून आणण्यास सांगतात हे तत्काळ बंद करण्यात यावे व संबंधित औषध गोळ्या रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात याव्यात संबंधित शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स हे स्वतःचे खाजगी दवाखाने थाटून बसले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच रुग्णांना देण्यात येणारे जेवण अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून त्याचा दर्जा वाढवून सक्षम अन्नपुरवठा करण्यात यावा सर्व कर्मचारी व डॉक्टर यांना युनिफॉर्म व नामपट्टी सक्तीची करण्यात यावी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या नवीन ओपीडी इमारतीचे तात्काळ उद्घाटन करून सुरू करण्यात यावी तसेच पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना शासकीय रुग्णालयाच्याच आवारात कमीत कमी चार ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच ओटी मधील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशा अनेक मागण्या सर्व पक्षी यांच्या वतीने शासकीय रुग्णालय त्याचा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर धपाटे सर यांना निवेदनाद्वारे देण्यात आले . जर याकडे गांभीर्यपूर्वक रुग्णालयाने लक्ष दिले नाही तर शासकीय रुग्णालयाच्या मुख्य गेट समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात येत आहे यावेळी भीमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव जी सरवदे साहेब लोक जनशक्ती पार्टी युवा चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक काळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ जगताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक भैय्या कांबळे तथा तालुका अध्यक्ष प्रमोद भैया युवा आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष अशोक जी पालके बहुजन समाज पार्टीचे काळुंखे साहेब सामाजिक कार्यकर्ते जहांगीरमिर खा पठाण युवा नेते अमित भैया जाजू व सर्व पक्षातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment