‘काव्यमुदिता’ पुस्तक प्रकाशन सोहळा व मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन

‘काव्यमुदिता’ पुस्तक प्रकाशन सोहळा व मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन
(मुंबई, प्रतिनिधी)

पंचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत यांच्या वतीने कवी अशोक भवार यांच्या ‘काव्यमुदिता’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २१ जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता चंद्रमणी बुद्धविहार, आयआयटी मेनगेट, पवई, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत नवनाथ रणखांबे राहणार आहेत. कार्यक्रमास सार्थक साहित्य प्रकाशनच्या संचालिका प्रा. आशा नवनाथ रणखांबे, साहित्यिक भदू जगदेव, पंचपीर ट्रस्टचे संचालक तथा साहित्यिक शाम परशुराम बैसाणे आणि भाऊ पंडागळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत.

     पुस्तक प्रकाशनानंतर मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून बबन सरोदे, गजानन गावंडे, राजरत्न राजगुरू, किरण सोनवणे, नवनाथ रणखांबे, संदेश कर्डक, के. पुरुषोत्तम, भदू जगदेव, प्रतीक कांबळे, शाम बैसाणे, सुरेखा गायकवाड, धनंजय सरोदे, विकास भंडारे, वसंत हिरे, अनंत धनसरे, संतोष नरवाडे, बाळासाहेब जोंधळे, सुधाकर सरोदे, श्रीकृष्ण टोबरे, वसंत वाघमारे, सुरेश घोडगे, अशोक भवार, अशोक शिंदे, सतीश धीवर, शाहीर कर्डक, अशोक दशरथ, बबन तुपेरे आदी विविध क्षेत्रांतील नामवंत कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. मानवता, सामाजिक समता, बंधुता, प्रेम, करुणा आणि परिवर्तनवादी विचारांना अभिव्यक्त करणाऱ्या कवितांमधून हा काव्यसोहळा रंगणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा गायकवाड करणार आहेत. साहित्य, कविता आणि मानवतावादी विचारांचा संगम अनुभवण्यासाठी साहित्यप्रेमी, कवी, विचारवंत आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी