शिवरायांच्या जयघोषात गढी ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
शिवरायांच्या जयघोषात गढी ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक .रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव राज्याभिषेक दिनानिमित्त गढी ग्रामपंचायत येथे उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन गढी ग्रामपंचायतचे सदस्य अमोल ससाणे यांच्या हास्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच " जय भवानी जय शिवाजी " च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला .
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या शौर्ये . दुरदृष्टी . न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श समाजाने अंगीकारण्याचे आवाहन गढी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोगडे यांनी केले .
शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला . आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून इतिहासात अजरामर कार्य केले . असे मत गढी ग्रामपंचायतचे सदस्य अमोल ससाणे व्यक्त केले
या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आशा वर्कर . डॉक्टर . यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना शिवरायांच्या जिवनातील प्रेरणादायी प्रसंगांना उजाळा देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला . ग्रामपंचायत परिसर देशभक्तीपर वातावरणाने भारावून गेला होता . शिवराज्याभिषेक दिनाच्या निमिताने युवकांमध्ये इतिहासाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी आणि शिवरायांचे विचार पुढील पिढीपर्यत पोहोचावेत हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले .
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार गढी ग्रामपंयतचे लिपीक नारायण जाधव यांनी मानले व हा शिवराज्याभिषेक दिन सौहळा अत्यंत उत्साहपुर्ण व प्रेरणादायी ठरेल आसे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले व कार्यक्रम संपला आसे जाहिर केल
Comments
Post a Comment