भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे यंत्रणा लागली कामाला
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू
भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे यंत्रणा लागली कामाला
बीड (प्रतिनिधी)
दि.४ : शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर रोडवरील बालेपीर मस्जिद परिसरात गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या प्रश्नाची दखल घेत भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. अखेर रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
बालेपीर मस्जिद परिसरात रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर डॉ.क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेर रखडलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याबद्दल डॉ. क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र भोपळे यांच्या उपस्थितीत डॉ.क्षीरसागर यांनी कामाची पाहणी केली. यावेळी कामाची गुणवत्ता व गती कायम राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी नगरसेवक शुभम धूत, मंगेश धोंगडे, राजेंद्र गुजर, मुस्तफा सय्यद, आबा गुजर, श्री गवते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment