परळी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ जूनला

परळी तालुक्यातील 'या' दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ जूनला

​बीड (परळी):परळी तालुक्यातील मुदत संपणाऱ्या आणि नव्याने गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, आगामी २४ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता परळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.
​मुंबई ग्रामपंचायत नियम १९६४ नुसार, तालुक्यातील वसंतनगर आणि कौठळीतांडा या २ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे वेगवेगळ्या आणि समांतर प्रवर्गासाठीचे आरक्षण यावेळी सोडत पद्धतीने निश्चित केले जाईल.
​या महत्त्वपूर्ण आरक्षण सोडत कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी