पंढरपूर येथील रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा

पंढरपूर येथील रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा
माजी सैनिक अशोक येडे यांनी घेतली भेट

पंढरपूर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमदार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टी, बीड जिल्ह्याच्या वतीने माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष) यांनी भेट दिली.

यावेळी अशोक येडे यांनी बीड जिल्ह्यात आम आदमी पार्टीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राबविलेल्या विविध आंदोलनांची माहिती दिली. यामध्ये केळवाटो आंदोलन, गाजर आंदोलन, आसूड आंदोलन तसेच शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर पक्षाने केलेल्या संघर्षाची सविस्तर चर्चा केली.

रोहित पवार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, शेतीसंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट देऊन आंदोलनाला नैतिक समर्थन दिले.

यावेळी सय्यद सादिक (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), राजेंद्रजी आमटे (शेतकरी हक्क मोर्चा), आकाश आमटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

"शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जे कोणी संघर्ष करत आहेत, त्यांच्या पाठीशी आम आदमी पार्टी सदैव ठामपणे उभी राहील," असे मत जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी यावेळी व्यक्त केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी