संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते- श्री ह भ प सुरेश महाराज जाधव

संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते- श्री ह भ प सुरेश महाराज जाधव 

संतांच्या दरबारात सेवा करण्याचे भाग्य पूर्व पुण्याईने मिळते- सुरेश महाराज जाधव 

श्रीक्षेत्र बेलेश्वर अधिकमास उत्सव.. कीर्तनाला हजारो भाविकांची गर्दी..

संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते- श्री ह भ प सुरेश महाराज जाधव
लिंबागणेश- (१३) संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते. संतांच्या दरबारात सेवा करण्याचे भाग्य पूर्व पुण्याईने मिळते. अधिकमासात संतांच्या दरबारात केलेली सेवा दुप्पट फळ देते.असे प्रतिपादन श्री ह भ प सुरेश महाराज जाधव यांनी केले. अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात सहाव्या दिवसाचे किर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत महादेव महाराज भारती श्री ह भ प महंत तुकाराम महाराज भारती, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे,श्री ह भ प बबन महाराज मंजरीकर, श्री ह भ प तुपे महाराज, बबन महाराज, यांच्यासह हजारो भावीक भक्तांची उपस्थिती होती. 


बीडच्या श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे अधिकमासाच्या पावनपर्वावर भव्य अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.या सप्ताहात सहाव्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प सुरेश महाराज जाधव यांनी गुंफले यावेळी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या..

भावे गावे गीत ।शुद्ध करूनियां चित्त ।। 1 ।।
तुज व्हावा आहे देव । तरी हा सुलभ उपाव ।। 2 ।।
आणिकांचे कानी ।गुण दोष मना नाणी ।। 3 ।।
मस्तक ठेंगणा ।करी संतांच्या चरणा ।। 4 ।।
वेंची ते वचन ।जेणे राहे समाधान ।। 5 ।।
तुका म्हणे फार ।थोडा तरी परउपकार ।। 6 ।।

या अभंगावर सुंदर चिंतन मांडले. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये लग्न आयुष्यात आल्यानंतर एकदाच कराव . कुंभ स्नान तीन वर्षातून एकदा करावं. देव आणि संतांची वारी वर्षातून एकदा करावी. व्यायाम, अभ्यास,दान आणि संघष्ठन माणसाने दररोज करावे.असे महाराजांनी सांगितले. संतांची सेवा आणि संतांचा सत्संग दररोज मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. संतांच्या संगती मध्ये गेल्यानंतर जीवनाचे सोने आणि कल्याण होते. सत्संगती मध्ये गेल्यानंतर देवप्राप्तीचा साधनेचे वर्म कळते. एवढेच नाही तर संत हे प्रत्येक पावला पावलाचे मार्गदर्शन जीवाला करतात. 

भजन करायचं असेल तर ते कसं केलं पाहिजे.. हे या अभंगातून सांगतात.शुद्धभावयुक्त अंतकरणाने केलेले भजन हे देवप्राप्तीचे सोपे साधन आहे.ते करावे असेही महाराजांनी सांगितले. दुसऱ्यांच्या गुणदोषाचे चिंतन न करणे, संतांच्या चरणाजवळ शुद्ध अंतकरणाने नतमस्तक होऊन सेवा करणे, देवप्राप्तीचे सोपे साधन आहेत तर बोलत असताना पुढील व्यक्तीचे अंतकरणात समाधान निर्माण होईल असं बोललं पाहिजे. बरेच असेल त्या ठिकाणी थोडा का होईना परोपकारकर्ता आला पाहिजे. एवढं केलं तरी देवप्राप्ती होऊ शकते. असं महाराजांनी सांगितलं. 

यावेळी वेगवेगळी उदाहरणे देत,व्यसनमुक्तीचा संदेश, स्त्री सक्षमीकरण, अभ्यासाचे महत्त्व, मुलांना संस्कार द्या, आई-वडिलांची सेवा करा. प्रत्येक मुलांनी आई-वडिलांचं ऐकलं पाहिजे गुरुजनांच्या संदर्भात आदरयुक्त भीती असली पाहिजे. जेवण करत असताना अन्नपदार्थाचा नास होऊ देऊ नका.अशा विविध सामाजिक विषयाचे प्रबोधन केले. महाराजांनी विनोदी शैली मधून लोकांना सामाजिक प्रबोधन केल्याने कीर्तनात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. 


यावेळी कीर्तनात साथ संगत. भजन सम्राट शहादेव महाराज येडे, संगीत अलंकार किशोर महाराज येडे, माऊली महाराज खोटे, मृदंग साथ अशोक महाराज येडे, बजरंग महाराज पावणे, व बेलेश्वर संस्थांवरील शेकडो टाळकरी मंडळी विणेकरी,चोपदार, तुळशीवाली माता भगिनी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी