बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यकपदी निवड; प्रज्ञा जाधव-आठवले यांचा नागसेन बुद्धविहारात सत्कार
परळी | प्रतिनिधी
रविवार दि. 14 जून 2026 रोजी नागसेन बुद्धविहार येथे आयुनी प्रज्ञा विशाल जाधव-आठवले यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांच्या वतीने उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात जाधव-आठवले परिवारातील सदस्यांनी भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून केली. त्यानंतर आयु. एस. ए. सोणवणे यांनी बुद्धवंदना घेत कार्यक्रमाला आध्यात्मिक वातावरण प्राप्त करून दिले.
यावेळी उमाजी वाघमारे, प्रा. व्ही. आर. गाडे, प्रा. आर. आर. डी. जाधव, ॲड. के. आर. गाडे तसेच माजी सरपंच मारुती सुरवसे यांनी आयुनी प्रज्ञा जाधव-आठवले यांचा शाल, पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव केला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आपल्या जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या बळावर मिळविलेल्या या यशामुळे परिसरातील युवक-युवतींना प्रेरणा मिळेल, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सांगता शरणयत्तने करण्यात आली. यावेळी नागसेन बुद्धविहार परिसरातील बहुसंख्य बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुनी प्रज्ञा जाधव-आठवले यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment