अंजनवती येथील येडे बंधुंचा संसार वादळीवाऱ्यासह पावसाने उद्ध्वस्त

अंजनवती येथील येडे बंधुंचा संसार वादळीवाऱ्यासह पावसाने उद्ध्वस्त ! पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्यासह खतही भिजले ! तातडीने नुकसानभरपाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे 
लिंबागणेश:- ( दि.१० ) बीड तालुक्यातील बालाघाटावरील अंजनवती गावातील पाटील वस्तीवरील पंजाब आणि पंढरीनाथ येडे या दोन सख्ख्या भावांचा काल दि.९ मंगळवार रोजी सायंकाळी वादळीवाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने संसार उद्धवस्त केला.घरावरील पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्याचे नुकसान झाले, पेरणीसाठी घरात ठेवलेल्या खताचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वैष्णवी पंजाब येडे या १८ वर्षीय मुलीच्या डोक्याला ४ टाक्याची जखम झालेली आहे.

तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घटनास्थळी भेट द्यावी :- डॉ.गणेश ढवळे 

आज दि.१० रोजी मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत आणि तलाठी नारायण दराडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा स्थळपंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी फोनवरून संवाद साधत संपुर्ण संसार उद्धवस्त झाला असुन प्रत्यक्ष घटना स्थळी भेट देण्याची विनंती केली. शिवशक्ती भिमशक्ति विचारमंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करत केवळ पंचनाम्याची औपचारिकता दाखवु नये यापुर्वीही झालेल्या पडझडीच्या पंचनाम्याची नुकसान भरपाई मिळाली नसल्याने तिव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच कैलासराव येडे,रेवण येडे, उद्धव येडे, संदिप येडे,नामदेव लेले, भालचंद्र ढास, नवनाथ करडुले,भागिरथ येडे यांची उपस्थिती होती.

संपुर्ण संसार उद्धवस्त झालाय,केवळ कागदं काळे न करता मदत करावी :- सुलभा येडे 

सुलभा पंजाब येडे यांनी संपुर्ण संसार उद्धवस्त झाला आहे. घरातील गृहपयोगी साहित्याची नासधूस झाली आहे, धान्य भिजले असुन रात्री निवारा शोधण्याची वेळ आली असून प्रशासनाने केवळ कागद काळे न करता प्रत्यक्षात मदत द्यावी असे म्हटले आहे.याचवेळी आरती पंढरीनाथ येडे धक्यातुन न सावरल्याने भोवळ येऊन पडल्या. दोघांचे मिळुन जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी